उर्मिला मातोंडकर बनली दत्तक मुलीची आई? नवऱ्याच्या फोटोपोस्टनं चर्चेला उधाण... Urmila Matondakar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urmila Matondkar and Mohsin Akhtar reveal they're not new parents..more details inside

उर्मिला मातोंडकर बनली दत्तक मुलीची आई? नवऱ्याच्या फोटोपोस्टनं चर्चेला उधाण...

Urmila Matondakr: उर्मिला मातोंडकर आणि तिचा नवरा मोहसिन अख्तरनं आज अचानक बॉलीवूडपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याचं झालं असं की १३ सप्टेंबर,२०२२ रोजी सकाळी,सकाळी उर्मिलाच्या नवऱ्यानं एक वर्षाच्या लहान क्यूट बेबी गर्लसोबत आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आणि लगोलग चर्चा सुरु झाली ती उर्मिला आणि मोहसिन आई-बाबा बनल्याची. लोकांना वाटलं कपलनं मुलगी दत्तक घेतली होती आणि ही गोष्ट सीक्रेट ठेवली होती. (Urmila Matondkar and Mohsin Akhtar reveal they're not new parents..more details inside)

हेही वाचा: Emmy Awards 2022:भारतात ट्रेन्डिंगला असलेल्या सीरिजचा डंका,जाणून घ्या विजेते

उर्मिला मातोंडकरचा नवरा मोहसिननं आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं होतं की,''वॉव,लिटील प्रिन्सेस,तुझ्या येण्यानं आमचं आयुष्य उजळून निघालंय,आज तुझा पहिला वाढदिवस साजरा करताना आनंद होतोय आणि सांगावसं वाटतंय तू हे एक वर्ष फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यात आनंद भरलायस,हॅप्पी बर्थडे प्रिय आयरा''.

बस्स...या पोस्टनंतर लोकांनी उर्मिला आणि मोहसिनला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. यासंदर्भात खरं काय ते जाणून घेण्यासाठी उर्मिला-मोहसीनला मीडियानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दोघांनी स्पष्ट केलं की,आयरा ही आमची पुतणी आहे. मोहसिनच्या मोठ्या भावाची मुलगी असं उर्मिला म्हणाली. त्यानंतर मोहसिननं आपली पोस्ट एडिट करत त्यात आयरा ही आपली पुतणी आहे असा स्प्षट उल्लेख केला.

हेही वाचा: 'महेश बाबू आणि मी आता...', राजामौलींचा आगामी सिनेमाच्या जॉनर विषयी मोठा खुलासा

पण उर्मिलानं हे स्पष्ट केल्यानंतर मात्र उर्मिलाचे चाहते थोडे नाराज झाले आहेत. कारण सर्वांना वाटत होतं की उर्मिलानं मुलगी दत्तक घेतली आहे आणि ती आई बनली आहे. पण असो, उर्मिलाची पुतणी मात्र या गैरसमजामुळे स्टार झाली. आता नेटकरी तिच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे.

Web Title: Urmila Matondkar And Mohsin Akhtar Reveal Theyre Not New Parentsmore Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..