बालचित्रपट हरवल्याची ऊर्मिलाला खंत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

"मासूम' चित्रपटातील "लकडी की काठी... काठी पे घोडा' गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात.

"मासूम' चित्रपटातील "लकडी की काठी... काठी पे घोडा' गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात.

प्रत्यक्षातही ऊर्मिलाला लहान मुलांबद्दल विशेष प्रेम आहे. रुची नारायण यांच्या "हनुमान दा दमदार' चित्रपटात "लकडी की काठी...' गाण्याचे रिक्रिएशन करण्यात आलंय. त्याचं लॉंचिंग नुकतंच झालं. ऊर्मिलाही तेव्हा उपस्थित होती. ती म्हणाली, "मी स्वतःला खूप नशीबवान समजते. खूप कमी वयात मला गुलजार, शबाना आझमी, शेखर कपूर, नसिरुद्दीन शहा आदी दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. हे गाणं आजच्या मुलांनाही खूप आवडतंय अन्‌ त्यावर ती आनंदाने नाचतातही.

गुलजारजींचे बोल कोणत्याही काळात अगदी ताजेच वाटतात.' आजही भर्मिलाला अनेक जण "मासूम'मधली घोडावाली मुलगी म्हणून ओळखतात. माझ्या आजूबाजूची छोटी मुलं आजही आपल्या बोबड्या भाषेत मला विचारतात, की "आप वो ही लकली घोलावाली लडकी हो ना?' असा किस्सा ऊर्मिलानेच सांगितला. "लहान मुलांसाठी चित्रपट बनवण्यासाठी खूप स्कोप आहे. तरीही त्यांच्यासाठी खूप कमी चित्रपट बनवले जातात. मला याचं खूपच वाईट वाटतं,' अशी खंतही ऊर्मिलाने बोलून दाखवली.  

Web Title: Urmila matondkar feeling veray sad we losing childhood movies