उर्वशीची 58 लाखांची साडी, लूक व्हायरल

अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडिय़ावर चर्चेत असते.
actress urvashi rautela
actress urvashi rautela Team esakal

अभिनेत्री उर्वशी रौतेला (actress urvashi rautela) कायमच आपल्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडिय़ावर चर्चेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर करुन तिनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ती चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं एका लग्नसमारंभात केलेली वेशभूषा. तिनं केलेली वेशभूषा ही 58 लाख रुपयांची होती. अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतेय. (urvashi rautela gujarati patola saree worth rs 58 lakh at manoj kumar granddaughter wedding)

उर्वशीनं मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये गुजराती पटोला साडी परिधान (gujrati patola saree) केली होती. त्याचे डिझाईन आशा गौतमनं (asha gautam) यांनी केले होते. त्यांनी तिचा मेक अप केला होता. उर्वशीनं इ टाइम्सच्या एका प्रतिनिधीशी बातचीत केली. त्यावेळी तिनं सांगितलं की, माझा संपूर्ण तो लूक 58 लाख रुपयांचा होता.

तिची वेशभूषा करणा-या स्टायलिशनं सांगितलं, उर्वशीची पटोला साडी तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. त्यासाठी 70 पेक्षा जास्त सिल्क शेड्स हे कलरिंगसाठी लागले. तर 25 दिवस त्याच्यावर कारागिरीसाठी लागले. ही साडी तयार करण्यासाठी 600 ग्रॅम सिल्कची गरज होती. ही महागडी साडी सिद्ध हेमग्रंथ यांनी साकारली आहे. जवळपास १२ लोकांनी गेल्या दोन वर्षांपासून ही साडी तयार केली आहे.

actress urvashi rautela
नीना गुप्ता यांच्या आत्मचरित्रातील ६ धक्कादायक खुलासे

उर्वशीच्या आगामी प्रोजेक्टविषय़ी सांगायचे झाल्यास ती शेवटी अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रुज या कलाकारांबरोबर पागलपंती चित्रपटामध्ये दिसली होती. तिनं गेल्यावर्षी बॉलीवूडमध्ये आपला डेब्यु केला होता. याशिवाय तिनं तमिळ, तेलुगू सारख्या चित्रपटांमधूनही भूमिका करण्यास ती आता तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com