उर्वशीने आईला दिला बर्थ डे निमित्ताने 'गोल्ड प्लेटेड" केक

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 2 January 2021

उर्वशीने इंस्टावर फोटो शेयर केले आहेत. त्यात ती ब्ल्यू रंगाच्या टॉप मध्ये दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उर्वशीने ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दुबईतील एका वाळवंटात फोटोशूट केलं होतं.

मुंबई - काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला ही एका फोटोशूटसाठी दुबईला गेली होती. तिथे त्यांनी वाळवंटात फोटोशूट केले होते. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. कायम चर्चेत असणारी उर्मिला आताही एका वेगळ्या गोष्टीसाठी हिट ठरताना दिसत आहे. 

उर्मिलाने तिच्या आईला वाढदिवसाच्या निमित्ताने एक आगळवेगळं गिफ्ट दिल आहे. त्यात तिने गोल्ड प्लेटेड केक कापला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तिच्या चाहत्यांना ते फोटो कमालीचे आवडले आहेत. त्यांनी त्यावर कमेंट दिल्या आहेत. तसेच उर्मिलाच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. यामुळे त्या केकचे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत. आपले चाहते आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात उर्मिला सक्रिय असते. 

Image may contain: 2 people, people sitting and indoor

उर्वशीने इंस्टावर फोटो शेयर केले आहेत. त्यात ती ब्ल्यू रंगाच्या टॉप मध्ये दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उर्वशीने ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दुबईतील एका वाळवंटात फोटोशूट केलं होतं. त्यासाठी तिने जो ड्रेस घातला होता त्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे ते फोटोशूट करणाऱ्या फोटोशूट करणाऱ्याने सांगितले होते. तिच्या त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे लाईक मिळाले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने उर्वशीच्या आईने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आहे. 

सुशांतच्या मृत्युमुळे रियाच्या बॉलीवूड करिअरला लागला ब्रेक, २०२१ मध्ये होणार का एंट्री?

उर्वशीने गोल्डन प्लेटेड डिझाइनचा केकचा फोटो शेयर केला करून चाहत्यांची पसंती मिळवली आहे. फोटोला शेयर करून त्यावर एक कॅप्शनही तिनं लिहिली आहे. ती म्हणते, मी माझ्या आईला जन्मदिनाच्या निमित्ताने एक गोल्ड प्लेटेड केक सरप्राईज केला आहे. 

Image may contain: 1 person, sitting and indoor

'आई मी तुझ्याशिवाय काहीही नाही. तुझे आशिर्वाद कायम माझ्या पाठीशी असू देत. तुझी कृपा माझ्यावर राहू दे. तुझ्याबरोबर असताना मी सर्व काही आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहे. उर्वशीने सध्या वर्जिन भानुप्रिया नावाच्या चित्रपटात काम केलं आहे. तसेच तिच्या वो चांद कहा से लाओगी या व्हिडीओलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Image may contain: 2 people, people sitting and indoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urvashi rautela post her mom birthday pic she gives gold plated cake to mom