Parveen Babi: 'बॉलिवूड अयशस्वी ठरला पण मी...,'परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये दिसणार ही अभिनेत्री..पोस्ट व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela

Parveen Babi: 'बॉलिवूड अयशस्वी ठरला पण मी...,'परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये दिसणार ही अभिनेत्री..पोस्ट व्हायरल

Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील तिच्या लूकमुळे चर्चेत होती. त्यानंतर तिने 190 कोटींचा बंगला खरेदी केला असल्याच्या बातम्या आल्या मात्र त्यानंतर तिच्या आईने या बातमीचे खंडण केले. आता अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसोबत एक मोठे अपडेट शेअर केले आहे.

सध्या उर्वशी रौतेला तिच्या चर्चेत असणाऱ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याच्या तयारीत आहे. तिचा हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी यांच्यावर आधीरित आहे. ती परवीन बाबी यांच्या बायोपिकमध्ये काम करत आहे.

मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी उर्वशीच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे.

उर्वीशीने पोस्टमध्ये एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये परवीनच्या जीवनकथेची झलक पाहायला मिळत आहे.

पोस्ट शेअर करताना उर्वशीने कॅप्शनमध्ये एक नोट लिहिली, 'बॉलीवूडने तुझ्यावर अन्याय केला पण तुला माझा अभिमान वाटेल परवीन बाबी. ओम नमः शिवाय. #PB ~ UR..खरंच हा नवा प्रवास जादुई आहे.. '

हा वसीम एस कानचा चित्रपट असून त्याची कथा धीरज मिश्रा यांनी लिहिली आहे. यात परवीन बाबीचे नाव ठळक अक्षरात लिहिलेले आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की हा चित्रपट अभिनेत्रीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगेल. तिचे सोनेरी क्षण पडद्यावर मांडेल.

आता उर्वशीचा ही पोस्ट या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. उर्वशीने या पोस्टमध्ये या चित्रपटाच्या स्क्रिप्टशी संबंधित पहिले पेजही शेअर केले आहे. ज्यामध्ये परवीन बाबीचे आई-वडील आणि तिच्या आयुष्याचा सुरुवातीचा प्रवास दिसतो. असे सांगण्यात आले आहे की परबीनचा जन्म तिच्या आई-वडिलांच्या लग्नानंतर 14 वर्षांनी झाला होता, त्यामुळे ती तिच्या आई-वडिलांची लाडकी होती.

जेव्हापासून उर्वशी रौतेला परबिन बाबीच्या बायोपिकमध्ये काम करत असल्याची बातमी समोर आली तेव्हापासून सर्वांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या होत्या. आता अभिनेत्रीने तिच्या ताज्या पोस्टद्वारे याची पुष्टी केली असल्याच बोललं जात.