बिग बीच्या हस्ते अभिनेत्री उषा जाधवच्या वेबसाइटचे अनावरण

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

मुंबई : धग या चित्रपटातून अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी उषा जाधव आता हिंदीत पुरती स्थिरावली आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा आणि अमिताभ बच्चन यांचा भूतनाथ 2 हा सिनेमाही आला होता. त्यात तिच्या कामाची मोठी चर्चा झाली होती. 

आता उषाने स्वत:ची वेबसाईट लाॅंच केली असून, बाॅलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडीयावर ती लाॅच केल्याचे जाहीर केले. याबाबत इ सकाळशी बोलताना उषा म्हणाली, सध्या अमिताभ बच्चन परदेशात आहेत. आज सकाळीच ट्विट करून या वेबसाईटची माहीती त्यांनी दिली. या साईटवर माझी संपूर्ण माहीती आहे. फोटो, मी केलेले सिनेमे असे सगळे यात असेल. www.ushajadhav.com यावर ही वेबसाईट पाहता येईल. 

उषा मधल्या काळात विरप्पन या सिनेमातही झळकली होती. आता ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असून वेळ आल्यावर आपण याची माहीती देऊ असे तिने इ सकाळला सांगितले. 

Web Title: Usha jadhav web site esakal news