भविष्य 'वाणी' 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

"उडे दिल बेफिक्रे...' म्हणत आजच्या तरुण पिढीला भुरळ पाडणारी अभिनेत्री वाणी कपूर बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानसोबत झळकणार असल्याचं सगळीकडे बोललं जात होतं. मात्र यावर अखेर बेफ्रिक्र गर्लने मौन सोडलंय. ही खूप चांगली बाब असल्याचं म्हणत तिने सांगितलं की, ही अफवा सत्यात उतरली पाहिजे. एका कार्यक्रमादरम्यान वाणीला विचारलं की, आदित्य चोप्रा तुला शाहरूख खानसोबत चित्रपटात घेण्याचा विचार करीत आहेत का? यावर ती म्हणाली की," मी असं व्हावं अशी आशा करते. तसं मला याबाबतीत काहीच माहीत नाही. या संदर्भात मला काहीच विचारण्यातही आलेलं नाही.

"उडे दिल बेफिक्रे...' म्हणत आजच्या तरुण पिढीला भुरळ पाडणारी अभिनेत्री वाणी कपूर बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानसोबत झळकणार असल्याचं सगळीकडे बोललं जात होतं. मात्र यावर अखेर बेफ्रिक्र गर्लने मौन सोडलंय. ही खूप चांगली बाब असल्याचं म्हणत तिने सांगितलं की, ही अफवा सत्यात उतरली पाहिजे. एका कार्यक्रमादरम्यान वाणीला विचारलं की, आदित्य चोप्रा तुला शाहरूख खानसोबत चित्रपटात घेण्याचा विचार करीत आहेत का? यावर ती म्हणाली की," मी असं व्हावं अशी आशा करते. तसं मला याबाबतीत काहीच माहीत नाही. या संदर्भात मला काहीच विचारण्यातही आलेलं नाही. सध्या मी काही चित्रपटाच्या स्क्रीप्ट वाचतेय; पण आतापर्यंत कोणताही चित्रपट साईन केलेला नाही.' 
 

Web Title: vaani kapoor

टॅग्स