वैभव तत्त्ववादी व तेजश्री प्रधानची अव्यक्त होणारी प्रेमकथा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई : "झी युवा' वाहिनीवरील "प्रेम हे' या मालिकेत वेगवेगळ्या प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. यातील पहिल्या भागात अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यात अव्यक्त होणारी गावरान प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. सोमवारी (ता.27) रात्री 9 वाजता ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत वैभव तत्त्ववादी म्हणाला, ""जेव्हा आपण पहिल्यांदा एखाद्या कलाकारासोबत काम करतो तेव्हा त्या कलाकाराशी कसे आणि किती जमेल याचे मनावर दडपण असते. मी आणि तेजश्री मित्रच आहोत आणि आम्हाला दोघांनाही एकत्र काम करायचे होते.

मुंबई : "झी युवा' वाहिनीवरील "प्रेम हे' या मालिकेत वेगवेगळ्या प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. यातील पहिल्या भागात अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यात अव्यक्त होणारी गावरान प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. सोमवारी (ता.27) रात्री 9 वाजता ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत वैभव तत्त्ववादी म्हणाला, ""जेव्हा आपण पहिल्यांदा एखाद्या कलाकारासोबत काम करतो तेव्हा त्या कलाकाराशी कसे आणि किती जमेल याचे मनावर दडपण असते. मी आणि तेजश्री मित्रच आहोत आणि आम्हाला दोघांनाही एकत्र काम करायचे होते. आम्हाला एकत्र काम करण्याची ही संधी झी युवाने दिली; त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. मुख्य म्हणजे पहिल्याच सीनपासून आमच्या दोघांची केमिस्ट्री चांगली जुळून आली.'' तर तेजश्री या मालिकेबाबत खूपच उत्सुक असून तिने वैभवचे कौतुक केले. ती म्हणाली, "वैभव एक उत्तम अभिनेता असून तो प्रोफेशनल फिल्मस्टार आहे.' "प्रेम हे' मालिका दर सोमवार व मंगळवारी रात्री नऊ वाजता "झी युवा' वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Web Title: vaibhav tatvvadi nd tejashree pradhan he prem