Vaibhav Tatwawadi: सिनेमात यायचं होतं..तरिही घरच्यांची जबरदस्ती नसताना वैभवनं केलं इंजिनिअरिंग..आता खुलासा करत म्हणाला..

या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर हा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी यांची प्रमुख भूमिका 'सर्किट' चित्रपटात आहे.
vaibhav tatwawadi
vaibhav tatwawadiSakal

'सर्किट' या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले आहे, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं आलं अन् त्याची जोरदार चर्चा रंगली.

या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर हा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी यांची प्रमुख भूमिका 'सर्किट' चित्रपटात आहे. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमानिमित्तानं ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत वैभवनं मनमोकळा संवाद साधत सिनेमातील त्याच्या अनुभवासोबतच वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

याच ईसकाळच्या पॉडकास्ट मुलाखतीत वैभवला जेव्हा विचारलं गेलं की 'सिनेमातच यायचं होतं तर इंजिनिअरिंगची एक सीट फुकट का घालवलीस?' यावर उत्तर देत तो म्हणाला, "माझं इंजिनिअरिंग झालं आहे पुण्याच्या सीओइपी कॉलेज मधून मी त्यावेळी एकाकिंका सपर्धा आणि प्लेज मध्ये पार्टीसिपेट करायचो आणि मला नेहमी अ‍ॅक्टर होयच होतं...आणि त्यामुळे माझं कास्टिंग डायरेक्टरशी भेटणं बोलणं होत राहायचं...त्यावेळी मला एकाकिंका करताना कास्टिंग डायरेक्टरने पाहिलं मग तस मला काम मिळत गेलं."

"कोणीतरी प्रेमाने विचारलं तर मी सांगेन, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि तेव्हातरी मला कोणी येऊन म्हंटल असतं ना की तू काळजी नको करु पुढचे 20 वर्ष तुझं खानं-पिनं त्याची काळजी मी घेतो तुला लॉन्च पण मी करतो तू काळजी नको करू तर मी नसत केलं पण तेव्हा कोणीच हे सांगायला आलं नाही की तू काळजी करू नको रे बाबा तुला फिल्म इंडस्ट्री मध्ये मी लॉन्च करेन त्यामुळे तस कोणीच भेटलं नाही"

अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तर वैभव तत्ववादीनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत दिली त्यामुळे पॉडकास्ट नक्की ऐका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com