विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'पटाखा'चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पुणे : विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'पटाखा' या चित्रपटाचा ट्रेलर काल (ता.15) प्रदर्शित झाला. सध्या रसिकांमध्ये ट्रेलर व्हायरल झाला आहे. पटाखा चित्रपटाचे नाव आधी छुरियां असे होते.

पुणे : विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'पटाखा' या चित्रपटाचा ट्रेलर काल (ता.15) प्रदर्शित झाला. सध्या रसिकांमध्ये ट्रेलर व्हायरल झाला आहे. पटाखा चित्रपटाचे नाव आधी छुरियां असे होते.

'पटाखा' चा ट्रेलर प्रियांका चोप्राने सर्वात आधी ट्विटरवर शेअर केला. ''मला विश्वास बसत नाही हा चित्रपट दोन सख्या बहिणींवर आधारित आहे. मला त्या दोघींना भेटायाचे आहे. '' , अशी प्रतिक्रिया प्रियांकाने दिली. यापुर्वी प्रियांकाने 'पटाखा' चे पोस्टर शेअर केले होते.

या चित्रपटाची कथा बडकी आणि छुटकी या दोन भांडकुदळ बहिणींच्या नात्यावर आधारित आहे. ज्या कधीही, कुठेही एकमेकांसोबत मारामारी करायला मागे पुढे पाहत नाही. या चित्रपटात प्रसिध्द टिव्ही अॅक्टर ‘मेरी आशिक़ी तुमसे ही’ मालिकेतील 'ईशानी' म्हणजेच राधिका मदान आणि दंगल चित्रपटातील 'बबिता कुमारी' म्हणजेच सान्या मल्होत्रा या दोघी प्रमुख भुमिका साकारत आहे. राधिका आणि सान्या दोघेंनी यामध्ये हटके भूमिका साकरली आहे.

तर कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि विजय राज हे देखील महत्वाची भुमिका साकारत आहे. हा चित्रपट यावर्षी 28 सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर नावाप्रमाणे धमाखेदार वाटत असला तरी रसिकांची याला कसा प्रतिसाद देतील हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

patakha

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaishu Bharadwaj directed 'Patakha' trailer released

फोटो गॅलरी