
Vandana Gupte Video:मंगलाष्टका..सनई-चौघडे अन् वरमाला..लग्नाच्या 50 व्या वाढदिवशी वंदना गुप्तेंनी पुन्हा बांधली लग्नगाठ
Vandana Gupte: मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाटक,सिनेमा,मालिका विश्वाचा एक काळ गाजवला आहे. आजही काही कलाकृतीतून त्यांचा दर्जेदार अनुभव पाहण्याचं भाग्य चाहत्यांना लाभतं. सध्या काम तसं त्यांनी कमी केलं असलं तरी सोशल मीडियावर मात्र त्या भलत्याच सक्रिय पहायला मिळतात. आता चक्क त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत आपण पुन्हा लग्नबंधनात अडकण्याचा आनंद अनुभवल्याचं सांगितलं आहे.
वंदना गुप्ते यांनी लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला . त्यांच्या पतीचे नाव शिरीष गुप्ते असे आहे. लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी आप्तस्वकीयांना निमंत्रित करून छोटा समारंभ आयोजित केला होता.
आपल्या जवळच्या नातलगांच्या साक्षीनं वंदना गुप्ते यांनी पती शिरीष गुप्ते यांच्यासोबत पुन्हा लग्नाचा आनंद अनुभवला. एकमेकांच्या गळ्यात पुन्हा एकदा वरमाला घालण्याचं सुख अनुभवलं.(Vandana Gupte 50th wedding Anniversary video viral)
या सोहळ्याचे काही खास क्षण त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ही खास पोस्ट शेअर करताना वंदना गुप्ते यांनी लिहिलं आहे, ''आमच्या या खास लग्नसोहळ्यासाठी माझी वहिनी अमेरिकेतून,माझी भाची कॅनडाहून तर माझी लेक वेस्ट इंडिजहून आलीय''.
'' माझे सगळे आप्तस्वकीय या खास दिवसानिमित्तानं आमच्या आनंदात सहभागी झालेयत. त्या सर्वांनी घरीच तयारी करून आम्हा दोघांना लग्नाचा अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवण्याचा आनंद दिला''.
'' सर्वात जास्त आनंद मला या गोष्टीचा झाला की आमची मुलं आमच्या या लग्नात आमच्यासोबत होती. आमच्या आयुष्यातील हा खास दिवस अधिक आनंददायी बनवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप आभार''.
वंदना गुप्ते यांची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. लोक आता त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
वंदना गुप्ते यांनी टाईम प्लीज,फॅमिली कट्टा,पछाडलेला,आंधळी कोशिंबिर,डबल सीट अशा अनेक सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बाईपण भारी देवा हा त्यांनी अभिनय केलेला सिनेमा यावर्षात आपल्या भेटीस येत आहे.