राम लिहिलेल्या 'त्या' टॉपमुळे वाणी कपूर झाली ट्रोल, नेटकऱी संतापले !

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

वाणी बोल्ड आणि हॉटनेसमुळे अनेकदा ती चर्चेचा विषय ठरते. अशाच एका कारणामुळे सध्या ती चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

मुंबई : वाणी कपूर या अभिनेत्रीने 2013 मध्ये 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2016 मध्ये रणवीर सिंगसोबत तिने 'बेफिक्रे' आणि 2019 मध्ये ती 'वॉर' या चित्रपटातून झळकली. वाणीने मोजकेच सिनेमे केले असले तरी आपल्या अभिनयाने बि-टाउनमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. तिच्या बोल्ड आणि हॉटनेसमुळे अनेकदा ती चर्चेचा विषय ठरते. अशाच एका कारणामुळे सध्या ती चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Neither lost.. Nor found 

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

वाणीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला होता. वाणीने तो फोटो अपलोड केल्यापासून इंटरनेटवर ती चर्चेचा विषय ठरली आहे. त्या फोटोमध्ये वाणीने जो टॉप घातला आहे जो आक्षेपार्य़ आहे आणि त्या टॉपवर 'राम' नावाची आहे. त्या बिकीनी टॉपवरवरील प्रिंटमुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. वाणीने धर्माचा अनादर केला आहे असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त करत तीला ट्रोल केलं आहे. 

Image may contain: 1 person, smiling

या बिकिनी टॉपवरील प्रभू रामाचे नाव पाहून नेटकऱी संतापले आणि त्यांनी वाणीची कमेंटमध्येच सुनावणी केली. या सर्व  प्रकारानंतर वाणीने तो फोटो इन्स्टाग्रामवरुन डिलीट केला. अस असलं तरी मात्र अजुनही तो फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 

Image may contain: 1 person, smiling, text

'कृपया धर्माची अशाप्रकारे चेष्टा करु नका', 'थोडी तरी लाज बाळगा मॅडम श्री रामचे नाव असलेले कपडे घातले आहेत', अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांमध्ये उमटल्या. 

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'वॉर' या चित्रपटातून वाणी झळकली. या सिनेमामध्ये ती हृतिक रोशन, टायगर श्रॉफ यांच्यासोबत दिसली. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलीच जादू केली आणि रेकॉर्डब्रेक कमाई केली. वाणीची या चित्रपटातील भूमिका छोटी असली तरी नक्कीच लक्षवेधी होती. दिग्दर्शक करण मल्होत्रा यांच्या 'समशेरा' या चित्रपटातून ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It's sunny in Paradise 

A post shared by VK (@_vaanikapoor_) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vani kapoor got troll for the top ram written on it