वरूण आणि अलिया करणार 'भिकारी'च्या गाण्याचं लाॅच

टीम इ सकाळ
गुरुवार, 22 जून 2017

26 जूनला हा सोहळा मुंबईत अंधेरी येथे होणार असून, यावेळी देवा देवा हे गाणे लाॅंच होईल. यासाठी खास वरूण आणि आलीया यांना बोलावण्या आले आहे. बाॅलिवूडचे प्रख्यात नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.

मुंबई : मराठी चित्रपटाच्या प्रेमात अलिकडे अनेक बाॅलिवूड कलाकार आहेत. शिवाय हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्ष काम केलेली मराठी मंडळीही मराठी सिनेमे बनवू लागल्याने त्या सिनेमाच्या लाॅंचिंगला, ़ट्रेलर लाॅंचला किंवा गेस्ट अॅपिअरन्स म्हणून हे कलाकार येत असतात. ह्रदयांतर त्याला अपवाद नाही. ह्रतिक रोशनपासून एेश्वर्या रायपर्यंत अनेक कलाकारांनी विक्रम फडणीस दिग्दर्शित या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जमेल तसा हातभार लावला आहे. आता भिकारी हा चित्रपटही याच यादीत येतो आहे. गणेश आचार्य दिग्दर्शित या सिनेमाचं पहिलं पोस्टर रणवीर सिंगने लाॅंच केले होते. आता या सिनेमाच्या पहिल्या गाण्याच्या लाॅंचसाठी वरूण धवन आणि अलिया भट ही जोडी येणार आहे.

26 जूनला हा सोहळा मुंबईत अंधेरी येथे होणार असून, यावेळी देवा देवा हे गाणे लाॅंच होईल. यासाठी खास वरूण आणि आलीया यांना बोलावण्या आले आहे. बाॅलिवूडचे प्रख्यात नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार ही जोडी दिसेल. सिनेमाचे एक पोस्टर नुकतेच लाॅंच झाले असून यात गणपतीच्या मोठ्या चित्राशेजारी स्वप्नील जोशी मुटकुळं करून झोपल्याचे चित्र आहे. देवा देवा हे गाणे बाप्पावरच बेतलेले असण्याची शक्यता आहे. 

काही दिवसांपूर्वी आलेल्या या पोस्टरला तापसी पन्नू आणि वरूण धवन यांसह अनेक बाॅलिवूड सेलिब्रेटींनी ट्विट करून इंडस्ट्रीत धमाका उडवून दिला होता. 

Web Title: Varun and alia song launch bhikari esakal news