esakal | दिलीप कुमार यांना रुग्णालयातून आज मिळणार डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Kumar hospitalised

दिलीप कुमार यांना रुग्णालयातून आज मिळणार डिस्चार्ज

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज (शुक्रवारी) डिस्चार्ज मिळणार आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रविवारी (६ जून) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर डिस्चार्जसंबंधी माहिती देण्यात आली. 'खारमधील हिंदुजा रुग्णालयातून दिलीप कुमार साहब यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा आणि जगभरातून त्यांच्यासाठी येणाऱ्या मेसेजेसबद्दल धन्यवाद', असं त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आलंय. (veteran actor dilip kumar to be discharged from hospital today)

दिलीप कुमार यांच्यावर प्लुरल अॅस्पिरेशनची यशस्वी प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती ९ जून रोजी ट्विटरद्वारे देण्यात आली होती. त्यांचे निकटवर्तीय फैजल फारुखी यांनी प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले होते. दिलीप कुमार यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनचा त्रास होता आणि त्यावर डॉक्टर उपचार करत होते. दिलीप कुमार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत पत्नी सायरा बानो यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी पसरणाऱ्या कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली होती.

हेही वाचा: त्या काळात कपूर कुटुंबानेही फिरवली होती आईकडे पाठ; करीनाचा खुलासा

सायरा बानो यांची विनंती

'गेल्या काही दिवसांपासून माझे प्रिय पती युसुफ खान यांची प्रकृती ठीक नसून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. माझे पती, माझे कोहिनूर, दिलीप कुमार साहब यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी माहिती मला डॉक्टरांनी दिली आहे. कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका अशी मी तुम्हाला विनंती करते', असं त्यांनी लिहिलं होतं.