ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

पुणे : सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८८ होते. आज दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पुणे : सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८८ होते. आज दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आकाशवाणीवरून प्रसारित होणारया अनेकविध कार्यक्रमांमधे त्यांचा सहभाग असे. जवळपास १०० मराठी आणि हिंदी चित्रपटांमधे त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवरयाला, आमच्या सारखे आम्हीच अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

Image result for jairam kulkarni

मोरूची मावशी या नाटकात जयराम यांनी सर्वात पहिल्यांदा काम केले होते. शाळेपासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran Actor Jairam Kulkarni Passed away