ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

मुंबई- आपला वास्तववादी अभिनय आणि भारदस्त आवाज यामुळे चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते. 

पुरी यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. आज (शुक्रवार) सकाळी ओम पुरी यांनी शेवटचा श्वास घेतला. 

ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियानमधील अंबाल शहरात झाला होता. पंजाबमधील पटियाला येथून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले होते. नंतर 1976 मध्य त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एका स्टुडिओमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी 'मजमा' या खासगी नाट्यमंडळाची स्थापना केली. 

घाशीराम कोतवाल या मराठी नाटकावर आधारित एका चित्रपटातून ओम पुरी यांनी कारकिर्दीची सुरवात केली. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या आक्रोश चित्रपटातून पुरी यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.
 
Web Title: veteran actor om puri passed away