ज्येष्ठ मेकअप आर्टीस्ट पंढरीनाथ जुकर काळाच्या पडद्याआड

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

'ब्लॅक ऍण्ड व्हाईट' चित्रपटांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या पंढरीदादांच्या हातामध्ये एक वेगळीच जादू होती.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यापासून माधुरी दीश्रित, करिना कपूर, अमृता सुभाष यांच्यापर्यंत असंख्य हिंदी व मराठी कलाकारांचे तसेच निर्माते व दिग्दर्शक यांचे लाडके रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर अर्थात पंढरीदादा यांचे दिर्घ आजाराने सोमवारी (ता. 17) दादर येथील सुश्रृषा रुग्णालयात निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारी (ता.18) सकाळी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी दादर येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. आणि त्यानंतर सकाळी 11.00 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Image may contain: 2 people

- 'सारथी'च्या निर्णयाविरोधात जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन 

तब्बल सहा दशके म्हणजेच साठहून अधिक वर्षे ते कलाक्षेत्रामध्ये रंगभूषाकार म्हणून कार्यरत होते. 'पंढरी दादा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सुप्रसिद्ध रंगभूषाकाराच्या हाताची जादू अनेक दिग्गज कलाकारांनी अनुभवली. राज कपूर, देव आनंद, श्रीदेवी, राजेश खन्ना, आमिर खान, विद्या बालन, नूतन, मधुबाला, सुनील दत्त, मनिषा कोईराला, नर्गिस यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या चेहऱ्याचा कायापालट करणारे रंगभूषाकार पंढरी दादा होते.

Image may contain: 1 person, sitting

'दिल वाले दुल्हनियॉं ले जाऐंगे', 'काला पत्थर', 'चित्रलेखा', 'नागिन', 'मिस्टर इंडिया', 'दीवार', 'सिलसिला', 'सौदागर', 'सात हिंदुस्तानी', 'नीलकमल', 'हमराज', 'क्रांती' अशा एकापेक्षा एक सुपरहीट चित्रपटांमधील कलाकारांना त्यांनी रंग दिला.

- HSC Exam 2020 : विद्यार्थ्यांनो, परिक्षेला जाताय? वाचा ही महत्वाची बातमी

पंढरीनाथ यांना राज्य शासनाच्या चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या साठहून अधिक वर्षांच्या मेहनतीला आणि कामाला मिळालेली दाद होती. तसेच अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले.

Image may contain: 1 person

- पुणे : औषधाच्या कॅप्सूलमधून तिने आणले वीस लाख किंमतीचे सोने!

'ब्लॅक ऍण्ड व्हाईट' चित्रपटांपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या पंढरीदादांच्या हातामध्ये एक वेगळीच जादू होती. शिवाजी पार्क दादार येथे त्यांची 'पंढरी जुकर्स मेकअप अकॅडमी'ही आहे. पंढरी दादा यांच्या निधनामुळे रंगभुषेमधील किमयागार हरपला असा शोक हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीमधून व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran makeup artist Pandharinath Jukar passed away at 88