Maharashtrachi Hasyajatra: माझे आजोबा जर्मनचे, हास्यजत्रा बंद होतंय पण समोर आला नवीन व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtrachi Hasyajatra, Maharashtrachi Hasyajatra video, prabhakar more, rasika vengurlekar

Maharashtrachi Hasyajatra: माझे आजोबा जर्मनचे, हास्यजत्रा बंद होतंय पण समोर आला नवीन व्हिडिओ

Maharashtrachi Hasyajatra News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय आहे. या शोमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी खास पाहुणे म्हणून हजेरी लावली.

हास्यजत्रा शोमध्ये समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, चेतना भट, शिवाली परब असे अनेक कलाकार मंचावर अक्षरशः धुमाकूळ घालतात.

आता महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर सहभागी होणार आहेत.

अशोक नायगावकर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सहभागी झालेत. यावेळी अशोक नायगावकर यांच्यासमोर रसिक वेंगुर्लेकर, पृथ्वीक प्रताप आणि इतर कलाकार स्किट करत आहेत.

यावेळी प्रभाकर मोरे म्हणतात माझे आजोबा जर्मनीचे. माझ्याकडे पुरावा आहे. आमच्या घरी २ जर्मनचे टोप आहेत त्यावर आजोबांची नावं आहेत.

असं म्हणताच सगळे हसायला लागतात. अशोक नायगावकर सर्वांचं कौतुक करताना म्हणतात.. एकेक नग शोधून काढलेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकार आता शेवटच्या भागांचं शूटिंग करत आहेत. हे शूटिंग करत असताना कलाकार एकदम खुश आहेत.

हास्यजत्रेतील बिवाली अवली कोहली म्हणजेच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केलाय. त्यावर २ महिन्यांनंतर भेटू असं कॅप्शन तिने लिहिलंय.

याशिवाय गौरव मोरेने सर्वांसोबत सेल्फी व्हिडिओ घेत आनेवाला पल, जानेवाला है असं गाणं लावलंय. शेवटचा दिवस, शेवटचं शूटिंग असं कॅप्शन देत कलाकार भावुक झाले आहेत.

याशिवाय हास्यजत्रेतील कलाकार रसिक वेंगुर्लेकरने चाहत्यांना दिलासा दिलाय. काळजी करू नका guys..शो बंद होत नाहीये. आम्ही MHJ टीम छोटीशी सुट्टी घेतोय. आम्ही लवकरच भेटू. खूप लवकर अशी पोस्ट करत रसिक वेंगुर्लेकरने चाहत्यांना माहिती दिलीय.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो बंद व्हायचं कारण म्हणजे सोनी मराठीवर लवकरच कोण होईल मराठी करोडपतीचा नवीन सिझन सुरू होतोय. पुन्हा एकदा अभिनेते सचिन खेडेकर KBC मराठीचा नवीन सिझन होस्ट करणार आहेत.

29 मेपासून, सोम. ते शनि., रात्री 9 वाजता KBC मराठी सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे. अशाप्रकारे हास्यजत्रा २ महिन्याचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला रुजू होईल.