मृत्यूचं सत्र संपेना! आणखी एक धक्का... प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात मृत्यू Saran Raj Passes Away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saran Raj Passes Away

Saran Raj Passes Away: मृत्यूचं सत्र संपेना! आणखी एक धक्का... प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात मृत्यू

Saran Raj Passes Away: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून पुन्हा एक दु:खद बातमी येत आहे. दिग्दर्शक वेत्रीमारन यांचे सहाय्यक दिग्दर्शक आणि सहाय्यक अभिनेते सरन राज (assistant director saran raj) यांचा अपघातात निधन झाले.

चेन्नईच्या केके नगर भागात सरनच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने अभिनेत्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे. तो दारूच्या नशेत ही कार चालवत होता. आरोपी देखील एक सहाय्यक अभिनेता असल्याच बोलल जात आहे. सरण राज यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

सरण राज हे मदुरावायलच्या धनलक्ष्मी येथे राहत होते. 8 जून रोजी रात्री 11.30 वाजता ते केके नगर येथील अर्कोट रोडवरून जात असतांना कारस्वाराने त्यांना धडक दिली. सरन यांनी हेल्मेट घातले नव्हते, त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शालिग्रामम च्या पलानियप्पन कडून हा अपघात झाल्याच तपासात समोर आलयं. आरोपी देखील  सहाय्यक अभिनेताही आहे. पलानीप्पन कार चालवत असताना मद्यधुंद अवस्थेत होते. त्याला पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सरण राज यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. 

वेत्री मारन हे देशातील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. दिवंगत सरन राज यांनी त्यांच्या प्रसिद्ध चित्रपट 'वडा चेन्नई'मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. याशिवाय वाडा चेन्नई आणि असुरनमध्येही त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या.

टॅग्स :EntertainmentdeathActor