वायकॉम18 मोशन पिक्चर्स 'सायकल'सह सज्ज

गुरुवार, 12 एप्रिल 2018

'सायकल' ही एक हलकीफुलकी कथा आहे. ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल.

मुंबई - 'आपला मानूस' चित्रपटानंतर, वायकॉम18 मोशन पिक्चर्स 'सायकल' हा मराठी सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. 4 मे 2018 ला प्रदर्शित होणाऱ्या सायकल या चित्रपटाच्या लक्षवेधक प्रवासाच्या काही झलक एका विशेष समारंभात स्टुडिओ दाखविणार आहेत. 'सायकल' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असून, या समारंभाला सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.

'सायकल' ही एक हलकीफुलकी कथा आहे. ज्यामधून तुम्ही स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू कराल. सायकल सिनेमा तुम्हाला भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात घेऊन जातो. या सिनेमात सायकल वर अतिशय प्रेम असलेल्या प्रमुख पात्राचे केशवचे हृद्यस्पर्शी चित्रण आहे. एके दिवशी केशवच्या गावात दोन व्यक्ती येतात आणि त्याची लाडकी सायकल चोरतात. यामुळे निराश झालेल्या केशवला आपली सायकल नक्की मिळेल ही आशा आहे. म्हणूनच केशव आपल्या सायकलच्या शोधात घराबाहेर पडतो. केशव ही सायकल शोधत असताना त्याच्या प्रवासा दरम्यान त्या चोरांचे काय झाले? त्याला त्याची सायकल परत मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट बघितल्यावर मिळणार आहेत.

'कॉफी आणि बरंच काही', 'अँड जरा हटके' आणि 'हंपी' सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली 'सायकल' हा सिनेमा चित्रित केला आहे. केशवच्या भूमिकेत हृषिकेश जोशी आहे. तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिका करत आहेत. तसेच चित्रपटामधील मैथिली पटवर्धनचा निरागस अभिनय नक्कीच प्रेक्षकांचे मनं जिंकेल यात शंका नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Viacom18 Is Presenting 18 Motion Pictures Saykal Movie Trailer