'जसं दिसतं...',विकी त्या प्रकरणावर स्पष्टच बोलला! सलमाननेही केलं...Vicky Kaushal Video |Vicky Kaushal on salman khan viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky Kaushal Video

Vicky Kaushal: 'जसं दिसतं...',विकी त्या प्रकरणावर स्पष्टच बोलला! सलमाननेही केलं...

Vicky Kaushal on salman khan viral Video: सध्या बॉलिवूडमध्ये IIFA अवार्ड 2023 चर्चेत आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार यात सहभागी होण्यासाठी अबुधाबीमध्ये पोहोचले आहेत . या मोठ्या कार्यक्रमात सुपरस्टार सलमान खान देखील सहभागी झाला होता .

सलमान खान त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाचे व्यस्त शेड्यूल अबुधाबीमध्ये शूट करणार आहे. यासोबतच तो आयफाचा भागही बनला.

त्यातच सलमान आणि विकीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत सलमानचा अंगरक्षक विक्की कौशलला धक्काबुक्की करताना दिसत होते . या व्हिडिओमुळे सलमान खानला प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यामुळे सगळीकडेच चर्चा सुरु झाली आणि अनेक तर्कवितर्क काढण्यात आले.

यावेळी विकी कौशल आणि अभिषेक बच्चन हे आयफा होस्ट करत आहेत. या कार्यक्रमापूर्वी आदल्या दिवशी एका व्हिडिओची खूप चर्चा झाली होती. जिथे सलमान खानच्या सुरक्षेने विकी कौशलला बाजूला केले. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, काही लोकांना सुरक्षेचे हे वागणे अजिबात आवडले नाही. त्यानंतर आता या व्हिडिओवर विकी कौशलची प्रतिक्रिया समोर आली आहे.

या विषयी बोलताना विकी म्हणाला, "कधीकधी गोष्टी व्हिडिओमध्ये दिसतात त्याप्रमाणे नसतात. कधीकधी गोष्टी वाढतात. अनेकवेळा विनाकारण त्याच्याबद्दल चर्चा होते. त्याचा काही उपयोग नाही. अनेक वेळा व्हिडीओमध्ये जे दिसते ते सारखे नसते.

त्यामुळे त्यावर बोलून काही फायदा नाही. त्या गोष्टींबद्दल खूप मूर्खपणा चालू आहे. त्यावर बोलण्यात अर्थ नाही. विकीच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं काहीही झालेलं नसून विकीने या गोष्टीबाबत जास्त विचारही केलेला नाही.

नंतर आयफाच्या कार्पेटवर, सलमान खान स्वतः विकी कौशलकडे गेला आणि त्याला कडाडून मिठी मारली आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. विकी शनिवारी अभिषेक बच्चनसोबत आयफा अवॉर्ड सोहळा होस्ट करणार आहे.

दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विकी कौशल लवकरच सारा अली खानसोबत 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात दिसणार आहे. तर सलमान खान टायगर 3 मध्ये दिसणार आहे. ज्यात त्याच्यासोबत विकीची पत्नी कतरिना कैफदेखील दिसणार आहे.