सर्जिकल स्ट्राईकवर आधारलेल्या 'उरी'चा टीझर प्रदर्शित 

शनिवार, 29 सप्टेंबर 2018

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' असे या चित्रपटाचे नाव आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तर मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचे पोस्टर जसे दमदार आहे तसेच, चित्रपटाचा टीझरही दामदार आहे.

मुंबई- भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' असे या चित्रपटाचे नाव आहे. विकी कौशल आणि यामी गौतम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तर मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचे पोस्टर जसे दमदार आहे तसेच, चित्रपटाचा टीझरही दामदार आहे.

जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात 19 भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित 'उरी' हा सिनेमा बनवण्यात आहे. चित्रपटात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत. तर मराठी अभिनेते- दिग्दर्शक योगेश सोमण हे चित्रपटामध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळते.
 

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. हा चित्रपट 11 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलने 'मसान', 'राझी', 'संजू' आणि अलिकेडेच रिलीज झालेल्या 'मनमर्जियां', या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचे अनेकांनी कौतुकही केले आहे. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#URIteaser out tomorrow! #watchthisspace #URI @adityadharfilms | @yamigautam | #RonnieScrewvala

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

दरम्यान, उरीतील लष्करी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 11 दिवसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. या हल्ल्यात अनेक दहशतवादी प्रशिक्षणाचे तळ नष्ट करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान नंतर सुरक्षितपणे भारतात परतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vicky kaushal Uri teaser now release