माधुरीच्या दिलखेचक अदा.. पायात घुंगरु बांधून पुन्हा केला जबरदस्त डान्स

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

धक धक गर्ल माधुरी सोशल मिडीयावर कथ्थक करताना पाहायला मिळतेय..माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला आहे..या व्हिडिओमध्ये ती पायात घुंगरु बांधुन कथ्थक करत आहे..

मुंबई- बॉलीवूडची धकधकगर्ल माधुरी दिक्षीत आणि तिच्या डान्सचे कित्येक दिवाने आहेत हे सांगणं देखील कठीण आहे..लॉकडाऊन दरम्यान कोणीच घराबाहेर पडू शकत नाहीये..मात्र घरात बसून सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसत आहेत..अशातंच धक धक गर्ल माधुरी सोशल मिडीयावर कथ्थक करताना
पाहायला मिळतेय..माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला आहे..या व्हिडिओमध्ये ती पायात घुंगरु बांधुन कथ्थक करत आहे..

हे ही वाचा: सलमानच्या 'प्यार करोना' गाण्यावर शाहरुखची कोपरखळी

लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर जाणं शक्य नसल्याने माधुरीने चांगलाच पर्याय शोधुन काढला आहे..माधुरीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल
होतोय..माधुरीने इंस्टाग्रावर हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शन दिलंय, 'घरात वेळ घालवण्यासाठी यापेक्षा उत्तम पर्याय काय असू शकतो, ज्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता.. हे माझ्या कथ्थक रियाजाचं दुसरं सत्र आहे..हॅशटॅग रियाजओवरकॉल' असं तिने म्हटलंय..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

What better way to spend time at home than doing something you love so much! Here's the second session of my Kathak riyaz

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

याबाबत अधिक सांगायचं झालं तर माधुरी सध्या तिच्या कथ्थकचा रियाज इंटरनेटच्या मदतीने करत आहे..या व्हिडिओमध्ये माधुरी दिक्षीत तिच्या पायात घुंगरु बांधून पूर्ण मन लावून, तल्लीन होऊन रियाज करताना दिसतेय..कथ्थक करताना माधुरीच्या दिलखेचक अदा चाहत्यांना चांगल्याचं घायाळ करत आहेत यात शंका नाही..या व्हिडिओवर तिचे चाहते देखील कमेंट करत आहेत..तुम्ही एकदम कमाल डान्सर आहात मॅम, मी तुमचा चाहता आहे यासारख्या अनेक कमेंट या व्हिडिओवर आहेत.

Madhuri Dixit's Son, Arin Nene Performing Kathak With His Mom Is A ...

याआधीच्या व्हिडिओमध्येही माधुरी पायात घुंगरु बांधून थिरकत होती..कधी माधुरी तिच्या मुलाने धरलेल्या तबल्याच्या ठेक्यावर थिरकते तर कधी ती तिच्या मुलाला कथ्थकची एक एक स्टेप शिकवताना दिसते..तिचा मुलगाही आईसारखा कथ्थक करण्याचा पुर्ण प्रयत्न करताना त्या व्हिडिओमध्ये दिसून आला होता..माधुरी तिचे अनेक
व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर शेअर करत असते..ज्यात ती कधी घरात जीम करताना तर कधी डान्स करताना पाहायला मिळते..  

video madhuri dixit dance practice with help of internet goes viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video madhuri dixit dance practice with help of internet goes viral