सुष्मिता सेनने भावाच्या लग्नात केली सगळी हौस पुर्ण (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

  • अभिनेत्री सुष्मिता सेनच्या भावाचा ग्रँड लग्नसोहळा
  • नवरीच्या आईने सुष्मिताला दिले खास गिफ्ट
  • दोन पध्दतीने संपन्न झाले विवाह विधी

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड सुष्मिता सेन गेल्या काही दिवसात तिचा भाऊ राजीव सेन याच्या लग्नकार्यात व्यस्त होती. या ग्रँड लग्नसोहळ्याचे फोटोज, तयारीचे फोटो आणि व्हिडिओ सुष्मिताने आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. जे सध्या व्हायरल होत आहेत. सुष्मिता आपल्या दोन्ही मुली, आई-वडील आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत राजीव सेन आणि चारु असोपा यांच्या लग्नासाठी गोव्याला पोहोचले.  

sen

सुष्मिता सेनच्या घरी आली नवरी; पाहा लग्नाचे फोटो

सुष्मिताने मेहंदी काढल्याचा फोटोही शेअर केला होता. चारुची आई निलम असोपा यांनी सुष्मिताला गिफ्ट देतानाचा व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे. ज्यात त्या सुष्मिताला राजस्थानी स्टाइलची साडी गिफ्ट करत आहेत. यावेळी सुष्मिता म्हणते, 'ही मला माझ्या लग्नाची साडीच असल्यासारखी वाटतेय.' 

 

गेल्याच आठवड्यात राजीव आणि चारु यांनी नोंदणी पध्दतीनं लग्नं केलं होतं. त्यानंतर हे जोडपं आणि कुटुंब गोव्याला रवाना झाले. तेथे प्रथम ख्रिश्चन पध्दतीने झाला. यावेळी राजीवने ऑफ व्हाइट रंगाचा ब्लेझर तर चारुने व्हाइट फ्लोरल प्रिंटचा गाऊन परिधान केला होता. नंतर हिंदु विवाह पध्दतीनेही सोहळा संपन्न झाला. यावेळी राजीवने ऑफ व्हाइट आणि गोल्डन रंगाची शेरवाणी आणि चारुने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. 
 

या लग्नं सोहळ्यातील कौटुंबिक कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. ज्यात राजीव आणि चारु सोबतच सुष्मिता आणि रोहमन या जोडप्यानेही डान्स केला आहे. 
 

 

 

sen

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: videos and photos goes viral of Sushmita Sen from brother Rajeev Sens wedding