अन्‌ विद्या बालनने मला ओळखलेच नाही !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

नागपूर - "आपण भगवान दादांसारखे दिसू शकतो, हे मला मेकअप झाल्यानंतरच कळले. तोपर्यंत मी कधी विचारही केला नव्हता. विद्याधर भट्टे यांच्या मेकअपने अशी काही कमाल केली की, खुद्द विद्या बालन यांनीदेखील मला दोन वेगवेगळ्या प्रसंगांना ओळखलेच नाही,‘ असे सांगत सुप्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई याने "एक अलबेला‘चे किस्से सांगितले. 

नागपूर - "आपण भगवान दादांसारखे दिसू शकतो, हे मला मेकअप झाल्यानंतरच कळले. तोपर्यंत मी कधी विचारही केला नव्हता. विद्याधर भट्टे यांच्या मेकअपने अशी काही कमाल केली की, खुद्द विद्या बालन यांनीदेखील मला दोन वेगवेगळ्या प्रसंगांना ओळखलेच नाही,‘ असे सांगत सुप्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई याने "एक अलबेला‘चे किस्से सांगितले. 

भगवानदादांच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांच्यापुढे लांलचक यादी होती. पण, त्यापैकी त्यांनी केवळ मंगेशवर विश्‍वास टाकला आणि त्याने भूमिकेचे सोने केले. मंगेश मात्र यात दिग्दर्शक, मेकअपमन यांचे श्रेय असल्याचे म्हणतो. "माझ्या कामाचे खूप कौतुक झाले. मी अगदी भगवानदादांसारखा दिसतोय, अशा कॉम्प्लिमेंट्‌सही मिळाल्या. मात्र, त्याचे श्रेय विद्याधर भट्टे यांच्या मेकअपला जाते. शूटिंगदरम्यान एक दिवस जिन्स-टीशर्टवर असताना मी जाता-जाता विद्याजींना "हाय‘ केले. त्यांनी फार रिस्पॉन्स दिला नाही. माझ्या मनात लगेच बॉलीवूडवाले असे असतात, तसे असतात वगैरे सुरू झाले. पण, थोड्याच वेळात त्या आल्या आणि भगवानदादांच्या रूपात बघायची सवय झाल्याने जिन्स-टीशर्टवर ओळखलेच नाही, असे त्या म्हणाल्या. दुसऱ्यांदा एकदा माझ्या बाजूला उभ्या राहूनच त्या "मंगेश किधर है?‘ असे लोकांना विचारत होत्या,‘ अशी गंमत त्याने सांगितली. चित्रपटगृहातील किस्सा सांगताना तो म्हणतो, "मी स्वतः शोला उपस्थित होतो. सिनेमा झाल्यावर प्रेक्षकांच्या रिऍक्‍शन ऐकण्यासाठी बाहेर थांबलो. सारेच नटाचे कौतुक करीत बाहेर पडत होते; पण मला कुणीच ओळखले नाही. उलट काही मित्र भेटले, तर "तू इथे कसा?‘ असे प्रश्‍न विचारत होते. माझ्यासाठी त्याच कॉम्प्लिमेंट्‌स होत्या.‘ 

 

पोटासाठी "विनोद‘ केला ! 

मी औरंगाबादवरून मायानगरीत आलो तेव्हा 22 वर्षांपूर्वी "हॅपी बर्थडे‘ या पहिल्या नाटकात गंभीर भूमिका केली. त्यानंतर आणखी काही नाटकांमध्ये अशाच भूमिका मिळाल्या. ही सारी नाटकं गाजली, पुरस्कारही मिळाले. मात्र, या भूमिकांच्या भरवशावर मुंबईत पोट कसे भरायचे हा प्रश्‍न होताच. एका नाटकात विनोदी पात्र साकारण्याची संधी मिळाली आणि एकामागोमाग एक विनोदी भूमिकाच मिळत गेल्या. पोटासाठी "विनोद‘ केला. त्याने जगवलेही. मात्र "ब्लाईंड गेम‘, "बैल‘, "एक अलबेला‘ यासारख्या चित्रपटांनी वेगळ्या कामाची संधी दिली.

Web Title: Vidya Balan and I did not know!