विद्या बालनच्या 'नटखट'ला मिळाले ऑस्करसाठी नामांकन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नटखट विजेता शॉर्ट फिल्म ठरली. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारसाठी नटखटला नामांकन मिळाले आहे.

मुंबई : आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडणारी सिने-अभिनेत्री विद्या बालनची आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टविलमध्ये प्रदर्शित झालेल्या विद्या बालनच्या नटखट या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला आहे. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारसाठी 'नटखट'ला नामांकन मिळाले आहे.

'नटखट'- समाजाचा आरसा  

रोनि स्क्रूवाला आणि विद्या बालन निर्मित 'नटखट' या शॉर्ट फिल्मचे शान व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. बलात्कार आणि अत्याचारावर ही शॉर्ट फिल्म भाष्य करते. ही शॉर्ट फिल्म एकूण 33 मिनिटांची आहे. आई आणि मुलाचे सुंदर नाते या चित्रपटामध्ये दाखवले आहे. समाजातील क्रूरता आणि महिलांकडे पाहण्याची नजर या विषयावर या शॉर्ट फिल्मची कथा लिहिलेली आहे. 'कोणत्याही बदलाची सुरुवात ही घरातूनच होते' हा संदेश या शॉर्ट फिल्म मधून दिला आहे. 

Vijay Sethupathi Birthday: पिझ्झा ते 96; सुपरस्टार विजयचे डिलक्स परफॉर्मन्स!


नटखटचा ऑस्करपर्यंतचा प्रवास

2020 मध्ये कोरोनामुळे अनेक शॉर्टफिल्म फेस्टिवल हे वर्चुअली स्क्रिनिंग करून झाले. अंतरराष्ट्रीय फिल्म समारंभामध्ये प्रदर्शित झालेल्या विद्या बालनच्या नटखट या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला. नटखट शॉर्टफिल्मचे वल्ड प्रीमियर हे ट्रीबेकामधील 'वी आर वन ए ग्लोबल फेस्टिवल' येथे झाला. त्यानंतर इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले. बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नटखट विजेता शॉर्ट फिल्म ठरली. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारसाठी नटखटला नामांकन मिळाले आहे. यामुळे टीम नटखट आणि विद्या बालनचे सर्वांनी कौतुक केले आहे. ऑस्कर हा कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. या आधी सत्यजित रे, ए आर रेहमान या सारख्या दिग्गज व्यक्तींना ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

विद्या बालन ही अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. भारत सरकारने विद्याला 2014 ला पद्मश्री पूरस्काराने गौरवले. 1995 सालच्या 'हम पांच' या झी टीव्हीवरील मालिकेमधून विद्याने अभिनयाची सुरुवात केली. 'परिणिता' या चित्रपटांमधून तिने बॅालिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले. अभिनय कौशल्यामुळे तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली. भूल भुलैय्या, हे बेबी, द डर्टी पिक्चर, कहानी, हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. बंगाली, तामिळ, मल्याळम या भाषेतील चित्रपटांमध्येही विद्याने काम केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

कार्तिकीची लग्नानंतरची पहिली संक्रांत; हळदी कुंकवाचे फोटो पाहिलेत का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidya Balan Natkhat short Film gets Oscar nomination