Happy Birthday:चुकून अॅक्टर झालो, मला तर..विजय देवरकोंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Vijay Devarakonda never wanted to become an actor his dream was different

HBD Vijay Devarakonda: चुकून अॅक्टर झालो, मला तर..

दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा आज जरी सगळ्यांचा लोकप्रिय अभिनेता असला तरी या अभिनेत्याचे खरे स्वप्न अभिनेता बणने कधीच नव्हते.आज या अभिनेत्याचा वाढदिवस खास असतो.(Tollywood)चाहत्यांचा विजय हा आवडता असला तरी त्याच्या वाढदिवशी लोकांना त्याच्याकडून मिळणाऱ्या खाऊसाठी त्याच्या वाढदिवसाची वाट असते.

अर्जूनने त्याच्या मागच्या वाढदिवशी ९ ट्रक भरून आईस्क्रिम वाटल्या होत्या.(Actor)हा त्याचा ३० वा वाढदिवस होता.हैदराबाद,विजयवाडा,तिरूपती,बेंगळुरू,चेन्नई आणि कोची या पाच शहरांत त्याने आईस्क्रिम वाटल्या होत्या.त्याआधीच्याही वाढदिवसाला त्याने पाच हजार आईस्क्रिम (Icecream)वाटल्या होत्या.त्यामुळे त्याच्या वाढदिवसाची सगळे वाट बघत असतात.

हेही वाचा: Pushpa Movie: ‘मैं झुकेगा नय साला...’

विजयला अभिनेता बनण्याची आवड नव्हतीच.त्याला बालपणीपासूनच गायनाची आवड होती.त्यासाठी त्याने शास्त्रीय संगिताचे(Music) शिक्षणही घेतले होते.पण पुढे त्याचा रस क्रिकेटमधे निर्माण झाला होता.त्यामुळे त्याने संगीत सोडले.विजयने २०११ च्या 'नुविल्ला' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून पदार्पण केले होते.मात्र 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली.या चित्रपटानंतर त्याला घरातलेही रावडी म्हणू लागले होते.असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.अभिनयासोबतच विजयने लघुपटाचं दिग्दर्शनही केलंय.अवघ्या पाच तासात त्याने या लघुचित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

विजय त्याच्या फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.तो त्याच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो.वियने बिझनेस क्षेत्रातही पाऊल टाकलेले दिसते.त्याने द रावडी क्लब हे ऑनलाईन फॅशन ब्रँड सुरू केले आहे.

Web Title: Vijay Devarkonda Birthday Today Know The Real Dream Of Vijay Devarkonda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top