साऊथ सुपरस्टार विजयने वडिल चंद्रशेखर यांच्या राजकिय पक्षातून घेतली एक्झिट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 6 November 2020

साऊथ सुपरस्टार विजयने त्याच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्काच दिला आहे. विजयने त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे की आता तो कोणत्याही राजकिय पक्षाशी जोडलेला नाहीये.

मुंबई- बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीच्या अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात पाय रोवला आहे. ज्यामध्ये काही जणांना यश मिळालं तर काही अजुनही यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यातंच आता बातमी आहे ती साऊथ सुपरस्टार विजयची. साऊथ सुपरस्टार विजयने नुकतंच स्वताःहून वडिल एस.ए चंद्रशेखर यांच्या राजकिय पक्षातून बाहेर पडला आहे. विजयने सोशल मिडियावर अधिकृतरित्या याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा: रश्मी देसाईचा घटस्फोटाबाबत खुलासा म्हणाली 'नंदीशची लक्षणं ठिक नव्हती'  

साऊथ सुपरस्टार विजयने त्याच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्काच दिला आहे. विजयने त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे की आता तो कोणत्याही राजकिय पक्षाशी जोडलेला नाहीये. त्यानंतर आता तो त्याच्या वडिलांच्या पक्षातून वेगळा झाला आहे. विजयच्या या घोषणेमुळे त्याच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याच्या या अधिकृत घोषणेनंतर विजय आणि त्याच्या वडिलांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. 

विजयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'माझ्या वडिलांनी जी राजकिय प्रतिक्रिया दिली आहे त्याचा माझ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काहीच संबंध नाही. मी माझ्या वडिलांचा राजकिय इच्छांची पूर्ती करण्यासाठी बांधिल नाहीये. मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो की माझ्या वडिलांनी जो पक्ष सुरु केला आहे त्यामध्ये सहभागी होऊ नका. जर कोणी त्यांच्या राजकिय इच्छा-आकांक्षासाठी माझ्या नावाचा, फोटोचा आणि माझ्या फॅन क्लबचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांच्याविरोधात आवश्यक ती कारवाई करेन.'

विजयच्या या प्रतिक्रयेआधी असं म्हटलं जात होतं की विजय आता राजकारणात एंट्री करेल मात्र आता विजयने स्पष्ट केलं आहे की त्याची अशी कोणतीच इच्छा नाहीये. विजयच्या आगामी सिनेमांबाबत बोलायचं झालं तर लोकेश कनगराज दिग्दर्शित 'मास्टर' या सिनेमात दिसणार आहे.

vijay distances himself from tamil film director and his father chandrasekhar political party  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay distances himself from tamil film director and his father chandrasekhar political party