विनोदवीराच्या स्मरणार्थ 'सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनोदवीराच्या स्मरणार्थ 'सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा'
विनोदवीराच्या स्मरणार्थ 'सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा'

विनोदवीराच्या स्मरणार्थ 'सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा'

sakal_logo
By
टीम इ सकाळ

आपल्या अभिनयानं मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये वेगळा ठसा उमटविणारे कलाकार सतीश तारे यांची एक्झिट सर्वांनाच हेलावून टाकणारी होती. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृती आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. विनोदाची समज, त्यावर असलेली हुकूमत आणि अफलातून टायमिंग यामुळे तारे लोकप्रिय झाले होते. आता त्यांच्या स्मरणार्थ नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध व्हावा, त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, ह्याकरता "विजय पटवर्धन फाऊंडेशन"नं एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यात तारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, "सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा" आयोजित केली आहे. ही स्पर्धा पुण्यात १९ ते २१ नोव्हेंबर रोजी पुण्यात पार पडणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा, फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, ह्या कार्यक्रमांमध्ये ज्या पद्धतीने स्किट सादर केली जातात तशी स्किट ह्या स्पर्धेत सादर करायची आहेत. प्रत्येक संघात जास्तीत जास्त ३ आणि कमीत कमी २ कलाकार असणे आवश्यक आहेत. विनोदाची जाण असलेले दिग्गज कलाकार ह्या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. कोरोनाच्या काळात अनेक कलाकारांना मदतीचा हात विजय पटवर्धन फाउंडेशननं दिला होता. बॅक स्टेज कलाकारांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. अशावेळी त्यांच्या दोनवेळच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशाप्रसंगी पटवर्धन फाउंडेशननं राज्यातील चाहत्यांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना अभिनेते विजय पटवर्धन यांना सांगितलं की, या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रुपये १,००० असून पहिल्या क्रमांकास रुपये २०,००० प्रशस्तीपत्र आणि करंडक असे पारितोषिक आहे. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या संघानाही पारितोषिक मिळणार असून सर्वोत्कृष्ट विनोद वीर पुरुष, सर्वोत्कृष्ट विनोद वीर स्त्री, सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक हे वैयक्तिक पुरस्कारही मिळणार आहेत. ह्या स्पर्धेतून होणारा आर्थिक लाभ, अडचणीत असलेल्या कलाकारांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर आहे. इतर माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'अक्षय' की 'रजनीकांत', 'सूर्यवंशी' Vs 'अन्नाथे' ; कोणाचं पारडं जड?

loading image
go to top