Vijay Sethupathi Birthday: पिझ्झा ते 96; सुपरस्टार विजयचे डिलक्स परफॉर्मन्स!

Vijay_Sethupati
Vijay_Sethupati

पुणे : १६ जानेवारी १९७८ला जन्मलेल्या साउथ इंडियन सुपरस्टार विजय सेथुपतीचा आज ४३ वा वाढदिवस. आपल्या साधेपणानं आणि तितक्याच दमदार अभिनयानं स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणारा हा सेल्फ मेड सुपरस्टार. कोणतेही बिग बजेट, बिग स्टारर चित्रपट न करताही लोकप्रियता मिळालेला हरहुन्नरी अभिनेता. त्याच्या वाढदिवशी त्याच्या सुपर डिलक्स परफॉर्मन्सबाबत आपण जाणून घेऊया. 

विजय सेथुपती तमिळ चित्रपटसृष्टीतलं गाजणारं आणि वाजणारं नाव. त्यामुळेच त्याला चाहते प्रेमाने 'मक्कल सेल्वन' म्हणतात. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी विजयने अकाउंटंट म्हणून काम केले. नकारात्मक भूमिका साकारून अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख त्याने निर्माण केली आहे. तमिळ व्यतिरिक्त त्याने मल्याळम आणि तेलुगू चित्रपटही केले आहेत. आणि तो कटरिना कैफसोबत आगामी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. कोणतीही पार्श्वभूमी आणि गॉडफादर नसताना अभिनय क्षेत्रात उतरणे आणि जगभरात ओळख निर्माण करणं ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट होय. 
पिझ्झा, विक्रम वेधा आणि सुपर डिलक्स हे त्याचे ब्लॉकबस्टर चित्रपट ठरले आहेत.

सुंदरपांडियन- 
या विनोदी चित्रपटातून विजयला वर्ल्ड क्लास अॅक्टर म्हणून ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेल्या जेगन या व्यक्तिरेखेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे इतर भाषांमध्येही नंतर रिमेक झाले. 

पन्नईयारम पद्मिनीयम- 
विजयने साकारलेल्या मुरुगेसनचं समीक्षकांनीही कौतुक केलं आहे. 

पिझ्झा- 
कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित 'पिझ्झा'ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. पिझ्झा या भटपटाचा क्लायमॅक्स चित्रपट पाहणाऱ्या सर्वांना धक्का देऊन जातो. यात विजयने साकारलेला मायकेल कार्तिकेयन प्रत्येकाच्या मनावर वेगळा ठसा उमटवून गेला. आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर त्याला तमिळचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला. 

सेथूपती- 
अनेक कॉमेडी चित्रपट केल्यानंतर विजयने आपल्या मोर्चा अॅक्शन ड्रामाकडे वळवला. सेथूपतीमध्ये विजयने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. हा एक मसाला मनोरंजन करणारा पॉवर अॅक्शन चित्रपट आहे. 

विक्रम वेधा- 
विजयच्या सुपरस्टार कारकीर्दीतील हा एक सर्वोत्कृष्ट सिनेमा. दमदार कथा, सस्पेन्स, क्लायमॅक्स, कॉमेडी, अॅक्शन आणि तितकाच दमदार अभिनय, आर. माधवन आणि विजय यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी आवर्जून पाहावा असा चित्रपट. एका गँगस्टरचं पोलिस अधिकाऱ्याबरोबर तयार झालेलं चोर-पोलिसापलीकडचं नातं आणि पडद्यावर त्यांनी केलेलं काम प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. यात माधवने विक्रम नावाच्या पोलिसाची तर विजयने वेधा नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारली आहे. या थ्रिलरसाठी विजयला दुसऱ्यांदा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.

९६ -
हा चित्रपट ज्यांनी पाहिलाय त्यांना या चित्रपटाचं म्युझिक आवडल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शरीरयष्टीवरून विजय धाडसी आणि गँगस्टर साकारणारा अभिनेता दिसत असला तरी त्याने एक सुपरहिट रोमँटिक चित्रपट केला तो ९६. हटके नाव, तितकीच हटके पण साधी कथा, गोविंद वसंता यांचं दमदार म्युझिक आणि त्रिशा आणि विजयचा पुन्हा प्रेमात पाडणारा अभिनय. अभिनयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या प्रत्येकाला एक प्रेमळ चपराक विजयने या चित्रपटाद्वारे दिली. प्रत्येकाला निखळ प्रेमाची जाणीव करून देणारा आणि वास्तविक जीवनाशी जोडणारा हा चित्रपट. 

सुपर डिलक्स -
स्क्रिप्ट आवडली तर कोणत्याही प्रकारची भूमिका करू हे विजयने पुन्हा एकदा सिद्ध केले. थिआगराजन कुमारराजच्या सुपर डिलक्समध्ये विजयने एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली. आणि आपल्या अष्टपैलू अभिनयाने त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कोरोनामुळे गेल्या वर्षीचा पुरस्कार सोहळा लांबणीवर पडला. त्यामुळे विजयला ढीगभर पुरस्कारांसाठी आता वाट पाहावी लागणार आहे. 

नुकतीच चित्रपटसृष्टीत १० वर्षे पूर्ण केलेल्या विजयचा हा प्रवास अद्भुत राहिला आहे. कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यानं हे सर्व मिळवलं आहे. आतापर्यंत १४ हून अधिक पुरस्कार, २१ वेळा उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकन त्याला मिळालं आहे. अभिनयासोबतच ऑरेंज मिताताई, जुंगा आणि मर्कू मलाई या चित्रपटांची निर्मितीही त्याने केली आहे. थालापती विजयसोबतचा नुकताच रिलिज झालेला मास्टर सध्या धुमाकूळ घालत आहे. 

- मनोरंजन विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com