बिग बॉस १४: विकास गुप्ताच्या आईने सोडलं मौन, ''बाइसेक्शुएलिटीच्या आधीच तुटलं होतं नातं''

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 31 December 2020

विकास गुप्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. रिलेशनशिपपासून ते कुटुंबाने बेदखल करण्यापर्यंत... विकासने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विकासच्या या गोष्टी एकतर्फी होत्या. मात्र आता त्याची आई शारदा गुप्ताने मौन सोडलं आहे.   

मुंबई- 'बिग बॉस १४' मध्ये सध्या अनेक उलथापालथ सुरु आहे. घरात अनेक नाती बिघडताना पाहायला मिळतायेत. या शोमध्ये विकास गुप्ताने एंट्री केली तर अर्शी खानने विकासच्या कुटुंबियांसोबतचं त्याचं नातं बाहेर काढत त्याबाबात खुलासे करायला सुरुवात केली. या प्रकरणावरुन खूप मोठं भांडण देखील झालं. मात्र बुधवारच्या एपिसोडमध्ये विकास खूप भावूक झाला. त्याने अर्शीसोबत त्याच्या भावना व्यक्त केल्या. शोमध्ये विकास गुप्ताने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. रिलेशनशिपपासून ते कुटुंबाने बेदखल करण्यापर्यंत... विकासने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विकासच्या या गोष्टी एकतर्फी होत्या. मात्र आता त्याची आई शारदा गुप्ताने मौन सोडलं आहे.   

हे ही वाचा: 'अतरंगी रे'चे दिग्दर्शक आनंद एल राय कोरोना पॉझिटीव्ह, अक्षय, सारा, धनुषला धोका  

विकास गुप्ताने नुकतंच एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं की त्याची आई आणि भावाने  त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवलं होतं कारण त्यांना लाज वाटत होती. बाइसेक्शुएलिटीची गोष्ट समोर आल्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली होती. सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या एका स्टेटमेंटमध्ये शारदा गुप्ता यांनी लिहिलंय, ''ही कल्पना करणं अशक्य आहे की मी माझ्या मुलासोबतचं नातं सेक्शुएलिटीसाठी तोडेन. माझ्या कुटुंबासाठी हे एक अपमानास्पद विधान आहे.

विकास गुप्ता और उनकी मां शारदा गुप्ता. फोटो साभार-facebook/sharda.gupta

हो माझं माझ्या मुलासोबतचं नातं खूप चांगलं नाहीये.मात्र यांच त्याने केलेल्या खुलास्यासोबत काहीही देणंघेणं नाहीये. जेव्हा त्याने सगळ्यांसमोर तो बाइसेक्शुअल असल्याचं सत्य सांगितलं त्याआधीच आम्ही आमच्या मुलासोबत नातं तोडलं होतं. आम्हाला त्याचं हे सत्य माहित होतं. मात्र तरीही आम्ही नेहमी त्याच्यावर प्रेम केलं आणि तो जसा आहे तसं त्याला स्विकारलं. मात्र ही गोष्ट पूर्णपणे चूकीची आहे की त्याला आम्ही त्याच्या बाइसेक्शुअलिटी बद्दल कळाल्यावर लांब केलं. त्यांनी म्हटलं की माझ्याकडून ही पहिली आणि शेवटची प्रतिक्रिया दिली आहे. मला ब्लेम गेम खेळायचा नाहीये. ''

vikas gupta mother sharda gupta breaks silence after he claims family broke ties because he is bisexual  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vikas gupta mother sharda gupta breaks silence after he claims family broke ties because he is bisexual