Vikram Gokhale News: मोठी अपडेट; विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात ventilator निघणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale

Vikram Gokhale: मोठी अपडेट; विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात ventilator निघणार

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृती संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली. (Vikram Gokhale health improved )

दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. 'त्यांच्या प्रकृतीमध्ये हळु हळु सुधारणा होत आहे. ते डोळे ही उघडत आहेत. पुढच्या ४८ तासात व्हेंटिलेटरची पण गरज भासणार नाही. तसेच बीपी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू आहे. ' असे मेडिकल बुलेटीनमध्ये दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क याडगीकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

काल, विक्रम गोखले गेल्या २४ तासांपासून अत्यवस्थ आहेत. डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे आत्ताच काही सांगता येणार नाही, अशी माहिती पत्नी वृषाली गोखले यांनी दिली आहे. माध्यमांना दिली होती.

टॅग्स :Vikram Gokhale