लहानपणीचे स्वप्न साकार : विन डिझेल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने आज भारताची यात्रा म्हणजे लहानपणीचे स्वप्न साकार होण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले. आगामी ऍक्‍शन थ्रीलर चित्रपट ट्रिपल एक्‍स ः दि रिटर्न ऑफ जेंडर केजच्या प्रचारासाठी तो भारतात आला आहे.

49 वर्षीय अभिनेता डिझेलचे पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्यासमवेत डी. जे. कारुसो आणि अभिनेत्री दीपिका पदुकोनही होती. हा चित्रपट भारतात शनिवारी प्रदर्शित होणार आहे.

डिझेलने इंस्टाग्रामवर म्हटले, की भारताचा दौरा ही एक सन्मानाची बाब आहे. विन डिझेल सकाळी आठच्या सुमारास मुंबईत पोचले. त्यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जिन्स घातली होती. डिझेलला पाहण्यासाठी विमानतळाबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती.

Web Title: vin diesel's dream of tour india comes true