विरुष्काचा व्हायरल होणार हा फोटो पहिला का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : बॉलीवू़ड आणि क्रिकेट जगातील सर्वात प्रसिद्ध जोडी विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोने नेटिझन्सचं लक्ष वेधलंय. हा फोटो खुद्द विराट कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केलंय.

विरोट कोहलीने शेयर केलेल्या या फोटोला काही मिनिटातच या 10 लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. या फोटोत अनुष्का ब्लॅक रंगाच्या ड्रेसवर दिसत आहे. तर विराट कोहली ग्रे टीशर्ट आणि ब्लॅक शॉर्ट्सवर दिसत आहे. यात ही जोडी रोमॅंटिक मु़डमध्ये असल्याच्या प्रतिक्रीया नेटीझन्सनं दिल्या आहेत. या आधी दोघांचा करवा चौथचा फोटो खुप व्हायरल झाला होता. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral photo of virat kohali and anushka sharma