विराट व अनुष्काच्या साखरपुड्याची चर्चा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

डेहराडून :  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्रा अनुष्का शर्मा यांच्या मैत्रीबद्दल सर्वत्र चर्चा होत असते. आता त्यांचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 

डेहराडून :  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्रा अनुष्का शर्मा यांच्या मैत्रीबद्दल सर्वत्र चर्चा होत असते. आता त्यांचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 

विराट व अनुष्का हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दाखले वेळोवेळी मिळाले आहे. प्रत्येक महत्त्वाच्या क्रिकेट सामन्याला अनुष्का आवर्जून उपस्थित राहते. दोघांच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून ते भेटत असतात. आताही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ते दोघे डेहराडूनला पोचले आहेत. पण दोघे येथील अलिशान हॉटेलमध्ये एकत्र येण्यास हे एकच कारण नाही. या दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचे ठरविले असून अगदी गुप्त पद्धतीने त्यांचा साखरपुडाही झाल्याची चर्चा आहे. 

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खुद्द अमिताभ बच्चन कुटुंबीयांसह उपस्थित होते. तसेच उद्योगपती अनिल अंबानी व त्यांची पत्नी टीना हेही कार्यक्रमात सहभागी झाले होते. डेहराडून विमानतळावर पोचल्याची अमिताभ, जया बच्चन व अनिल अंबानी यांची छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 

Web Title: Virat and Anushka discussion of engagement