esakal | विरुष्काने दिली गूड न्यूज! जानेवारीत होणार चिमुकल्या पावलांच आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

virushka

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावरून त्याने अनुष्काचा फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे.

विरुष्काने दिली गूड न्यूज! जानेवारीत होणार चिमुकल्या पावलांच आगमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावरून त्याने अनुष्काचा फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे. सध्या विराट कोहली आयपीएल 2020 साठी युएईला गेला आहे. विराट आणि अनुष्का यांनी 11 डिसेंबर 2017 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. 

विराट आणि अनुष्का यांच्या घरी जानेवारी महिन्यात चिमुकल्या पावलांच आगमन होणार आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अनुष्का गर्भवती असल्याचं विराटने फोटो शेअर करून सांगितलं आहे. तसंच जानेवारी मध्ये ही आनंदाची बातमी मिळणार असल्याचंही तो म्हणाला आहे. 

विराटने ट्विटरवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यानं म्हटलं की, आणि आम्ही तिघे असू! जानेवारी 2021 ला घरी बाळ येणार... असा कॅप्शन विराटने दिला आहे. आनंदाची बातमी सांगितल्यानंतर विराट आणि अनुष्काला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.