व्हीयूवर 'कौशिकी' - मैत्रीच्या गडद छायेची रोचक कथा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

डिजिटल व्यासपीठावर प्रसिद्ध असलेला युथ आयकॉन रणविजय सिंग याने अभिनेत्री सयानी गुप्ता हिच्यासोबत या मालिकेत मुख्य भूमिका निभावली आहे.

पुणे​ - '​व्हीयू'ने आपल्या नव्याकोर्‍या ‘कौशिकी’ या डिजिटल सिरीजचे सादरीकरण केले आहे. व्हीयूक्लिप आणि पीसीसीडब्ल्यू यांच्या 'व्हीयू' या व्हिडीओ-ऑन-डिमाण्ड सेवेने रोमांचकारी थ्रिलर सादर केले असून प्रेक्षकांना खुर्चीतच खिळवून ठेवणारी ही मालिका आहे. ही कथा आहे, दोन सख्ख्या मित्रांची. या दोघांपैकी प्रत्येकाचे एक गडद गूढ आहे. ही मैत्री उलगडताना व्हीयू अ‍ॅप आणि www.viu.com या संकेतस्थळावर दर्शकांना बघता येईल. 

डिजिटल व्यासपीठावर प्रसिद्ध असलेला युथ आयकॉन रणविजय सिंग याने अभिनेत्री सयानी गुप्ता हिच्यासोबत या मालिकेत मुख्य भूमिका निभावली आहे. या मालिकेत ओमकार कपूर, नमित दास, मानसी स्कॉट, श्रुती श्रीवास्तव आणि राजीव सिद्धार्थ यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

Kaushiki

‘कौशिकी’मध्ये पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणारा रणविजय सिंग म्हणाला, 'कौशिकीसारख्या मालिकेचा भाग होण्याची संधी मिळणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मला जेव्हा कौशिकीबद्दल विचारणा करण्यात आली, तेव्हा मी केवळ माझ्या पात्राविषयी माहिती करून घेतली आणि सारे काही परफेक्ट असल्याचे मला जाणवले. संहितेपासून ते मी जे पात्र वठवत आहे, तिथपर्यंत या मालिकेसाठी आमच्या सर्व टीमने खूप मेहनत घेतली असून प्रेक्षकांना हा शो नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.'

या सिरिजमध्ये प्रमुख पात्राच्या भूमिकेत दिसणारी सयानी गुप्ता म्हणाली, 'माझ्या आवडीच्या भूमिका करण्याची संधी मला कौशिकी या सिरिजमधून मिळली. ही पटकथा वाचूनच मी फार आनंदी झाले होते. या मालिकेत एकप्रकारची सूत्रबद्धता असून सर्वांसोबत चित्रिकरण करताना मला फार मजा आली. याचा ट्रेलर प्रसारित झाला असून या मालिकेचे प्रदर्शन होण्यासाठी मी फार उत्सुक आहे. मला कौशिकीची भूमिका करताना जितकी मजा आली, तितकीच मजा प्रेक्षकांनाही ही मालिका पाहताना नक्की येईल.'

Kaushiki

सिरीजमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा नमित दास म्हणाला, 'काही कथा इतक्या प्रभावी असतात की त्या पाहण्यापासून तुम्ही स्वतःला रोखूच शकत नाही. कौशिकी ही त्यापैकीच एक कथा आहे. संहिता न वाचताच मी या भूमिकेला होकार दिला. या कथेचे सारच इतके उत्साहपूर्ण होते की मी नाही म्हणूच शकलो नाही. या सिरीजच्या चित्रीकरणातील प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला असून प्रेक्षकांनाही आमचा परफॉर्मन्स नक्की आवडेल.'

कौशिकीचा एक भाग झाल्याबद्दल ओम कपूर म्हणाले, 'कौशिकीची संहिता अद्वितीय असून अंकूश हे पात्र अनेक दडलेल्या रहस्यांमुळे फारच खास झाले आहे. दिग्दर्शनापासून कलाकारांच्या निवडीपर्यंत, सर्वच गोष्टी परफेक्ट आहेत. कौशिकीच्या ट्विस्टपूर्ण कथेमुळे ही मालिका लोकांना गुंतवून ठेवेल, अशी मला खात्री वाटते.'

Kaushiki

सीझनमधील सर्वात बहुप्रतिक्षित सिरीज दिग्दर्शित करताना आलेल्या अनुभवांबाबत बोलताना दिग्दर्शक सुपर्ण वर्मा म्हणाले, 'थ्रिलर हा प्रकार मी पुन्हा एकदा हाताळत असल्यामुळे कौशिकी करताना मला हे माझे होम ग्राऊण्डच वाटले. मला हा प्रकार करणे फार आवडते. ही मालिका नकारात्मक पात्रांनी तसेच, चुकीची तत्वे आणि रहस्यांनी भरली असून एकाच गुढ गोष्टीभोवती ही फिरते. प्रत्येक कलाकाराने आपापल्या पात्रात एक खास गंमत आणली आहे. या मालिकेला सर्वतोपरी सहाय्य देणार्‍या व्हीयूच्या समर्थ व छान टीमह काम करताना मला खूप आनंद झाला.'

‘कौशिकी’ ही मालिका सयानी गुप्ता हिच्या कौशिकी या पात्राभोवती फिरत असून ती उच्चभ्रू मित्रपरिवाराचा एक भाग असते. तिच्या आयुष्यात होणार्‍या बदलांविषयी आनंदी असलेली कौशिकी एका गुंत्यात सापडते. तिचे मित्र-मैत्रिणी जसे दिसतात तसे ते नाहीत, हे तिला अचानक समजते. 

kaushiki

kaushiki

kaushiki

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viu kaushiki digital series