Vivek Agnihotri: दिपिकाचं कौतुक करुन ट्रोल झालेल्या अग्नीहोत्रींनी आता केली सारवासारव म्हणाला, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri

Vivek Agnihotri: दिपिकाचं कौतुक करुन ट्रोल झालेल्या अग्नीहोत्रींनी आता केली सारवासारव म्हणाला,

मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे प्रत्येक मुद्यावर त्यांच मतं मांडत असतात. मग त्यात स्वरा भास्कर असो किंवा कंगणा राणौत त्याचप्रमाणे काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचाही या यादीत सामावेश होतो.

नुकतच विवेक अग्नीहोत्री यांनी दीपिका पदुकोण हिचं ट्विट करत कौतुक केलं. त्यावरुन त्यांना इतकं ट्रोल केलं गेल की आता त्यांनी यावर स्पष्टीकरण देत त्यांचा मुद्दा मांडला आहे. त्याच झालं असं की, दीपिका पदुकोण ऑस्कर 2023 मध्ये प्रस्तुतकर्ता म्हणून सहभागी होणार आहे. यामुळे बॉलिवूडशी संबंधितच नव्हे तर सर्वच स्तरावरील लोकांनी दीपिकाचं कौतुक केले आणि तिला शुभेच्छा दिल्या.

दीपिकाचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचाही सामावेश होता. जगभरातील बड्या स्टार्ससोबत दीपिका पदुकोणचेही नाव होते. यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले होते की, हे भारतीय चित्रपटांचे वर्ष आहे. अनुपम खेर यांनीही दीपिका पदुकोणचे जोरदार कौतुक केले.

Vivek Agnihotri tweet

Vivek Agnihotri tweet

विवेक अग्निहोत्री यामुळे ट्रोल झाले तरी आता त्यानी पुन्हा ट्विट केलं आहे.

विवेक अग्निहोत्री म्हणाले, “ठीक आहे… या नवीन जगात, जेव्हा तुम्ही एखाद्याशी सहमत नसतात त्यावेळी त्यांच्यावर टीका करतात आणि जेव्हा तुम्हाला एखाद्याची कृती आवडते तेव्हा तुम्ही त्याच कौतुक करतात आणि याला डबल स्टँडर्ड म्हणतात. बरं, मला वाटतं याला निपक्षपात म्हणतात. जो कोणी भारताचा अभिमान वाढवेल.. तो कौतुकास पात्र आहे.

यापुर्वी विवेक अग्निहोत्री यांनीही दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीच्या सीनवर आक्षेप घेतला होता. विवेक अग्निहोत्री यांनी दीपिकावर अनेकदा टीका केली आहे. मात्र, दीपिकाचे कौतुक करणाऱ्या पोस्टमध्येही त्याने तिचे नाव घेतले नाही. यावरही अनेकांनी त्याला खूप ट्रोल केलं होत.