एका 'स्टार'ने सुशांतचं करिअर संपवण्याची दिली होती धमकी, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा धक्कादायक खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 31 August 2020

विवेक अग्निहोत्री यांनी पुढे येऊन या प्रकरणात एक नवीन खुलासा केला आहे. विवेक यांनी म्हटलंय की रिया हा केवळ एक प्यादं आहे आणि मुंबई पोलिस महाराष्ट्र सरकारसोबत मोठ्या पॉवरफुल लोकांना वाचवण्याचं काम करत आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता विवेक अग्निहोत्री यांनी पुढे येऊन या प्रकरणात एक नवीन खुलासा केला आहे. विवेक यांनी म्हटलंय की रिया हा केवळ एक प्यादं आहे आणि मुंबई पोलिस महाराष्ट्र सरकारसोबत मोठ्या पॉवरफुल लोकांना वाचवण्याचं काम करत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हा आरोप त्यांच्या सोशल मिडियावर पोस्टमधून केला आहे.

हे ही वाचा: सुशांतची ऑडिओ क्लिप आली समोर, बॉलीवूड सोडण्याची करत होता गोष्ट

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका जुन्या घटनेबाबत सांगितलं आहे. त्यांनी असा दावा केला आहे की बॉलीवूडमधील एका स्टारने सुशांतचं करिअर संपवण्याची धमकी दिली होती. विवेक यांनी या स्टारच्या नावाचा उल्लेख त्यांच्या पोस्टमध्ये केलेला नाही. त्यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, 'एकदा एका फार्म हाऊसमध्ये सुशांतचा एका मोठ्या स्टारसोबत वाद झाला होता ज्याला एका स्टारने लॉन्च केलं होतं. त्यानंतर रागात त्याने सुशांतला त्याचं करिअर संपवण्याची धमकी दिली होती अगदी तसंच जसं त्याने याआधी इतरांच करिअर संपवलं. रिया केवळ एक मुखवटा आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार काही पॉवरफुल लोकांना या प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.'

Image

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याआधी बॉलीवूडमधील वाढत्या ड्रग्सच्या वापराविषयी आणि ड्रग माफियांविषयी देखील बोलले होते. त्यांनी म्हटलं होतं की गेल्या १० वर्षात बॉलीवूडमध्ये ड्रग्सचा वापर अगदी सामान्य झाला आहे. या ड्रग्ससोबतंच बॉलीवूडमध्ये कित्येक शैतानांनी त्यांचे फायदा करुन घेतला आहे. आणि यामुळेच इंडस्ट्रीमध्ये चुकीची आणि बेकायदेशीर कामं होतात. विवेक यांच्यासोबतंच अभिनेत्री कंगना रनौटने देखील बॉलीवूडमधील ड्रग माफियांबद्दल अनेक खुलासे केले होते.   

vivek agnihotri says a bollywood star threatened to end sushant singh rajputs career


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vivek agnihotri says a bollywood star threatened to end sushant singh rajputs career