विवेकची ऍक्‍शन आता तमीळ चित्रपटात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या आगामी तमीळ चित्रपट "विवेगम'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सर्बियात हे चित्रीकरण सुरू असून कमी तापमानातही त्याने बॅटल टॅंक राईड आणि स्टंट्‌स केले. चित्रपटात विवेक खलनायकाची भूमिका साकारात आहे. तो अभिनेता अजितसोबत दमदार ऍक्‍शन करणार आहे. चित्रपटातील स्टंट हॉलीवूडमधील ऍक्‍शन दिग्दर्शकाने आणि त्यांच्या टीमने कोरियोग्राफ केले आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत विवेक खूपच उत्सुक आहे. लेखक व दिग्दर्शक सिवा आहेत. विवेकव्यतिरिक्त अजित, काजल अगरवाल आणि अक्षरा हसन मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Vivek Oberoi begins shooting for his Tamil film in Serbia