..अन ललिताला घर मिळाले!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई: अभिनेता विवेक ओबेराॅयने संवेदनशीलतेचा एक नबा धडा घालून दिला आहे. काही वर्षांपूर्वी अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेल्या ललिताला रहायला घरही नव्हते. मार्चमध्ये एका कार्यक्रमादरम्यान विवेक आणि ललिताची भेट झाली. त्यावेळी ही बाब त्याच्या लक्षात आली. तिची स्थिती ओळखून ललिताला घर द्यायचा मानस त्याने बोलूनही दाखवला होता. 

काही दिवसांपूर्वी ललिताचा विवाह झाला. त्यावेळी विवेकने अचानक त्या सोहळ्याला हजेरी लावली आणि नवदाम्पत्याला फ्लॅटची चावी भेट म्हणून दिली. यावर बोलताना तो म्हणाला, 'ललिताच समाजाची खरी नायिका आहे. तिने तिच्यासारख्या अनेक अॅसिड हल्ला झालेल्यांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. तिला आणि तिचा पती राहुल यांना मी नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ललिताला मी साहस फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात भेटलो होतो. तिचे व्यक्तिमत्व पाहून मी भारावून गेलो होतो.'

Web Title: Vivek Oberoi gifted home to Lalita

टॅग्स