कॅन्सरग्रस्त मुलांच्या पाठिशी विवेक ओबेरॉय, 'जान है तो जहान है' म्हणत केला व्हिडिओ शेअर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनामुळे भीषण परिस्थिती जगभरातच निर्माण झाली असताना सीपीएएकडेही आता कॅन्सरग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी फारसा निधी उरलेला नाही. विवेक त्याच्या परीने या संस्थेला मदत करतो. मात्र आणखी मदतीची गरज आता या संस्थेला आहे. यासाठी विवेकने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशभरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये प्रत्येक रुग्णालयांमध्येदेखील तणावाचं वातावरण आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि प्रत्येक रुग्णांवर उपचार करणं हे मोठं आव्हान आज देशभरातील रुग्णालयांसमोर आहे. अशामध्ये सामाजिक संस्था मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. मात्र काही सामाजिक संस्थाकडेही आता फारसा निधी उपलब्ध नाही. यातीलच एक संस्था म्हणजे कॅन्सर पेशंट एड असोशिएशन (सीपीएए). सीपीएए ही संस्था कॅन्सरग्रस्त मुलांसाठी काम करते. या संस्थेशी अभिनेता विवेक ओबेरॉयदेखील जोडला गेला आहे. गेली 18 वर्षे तो या संस्थेबरोबर काम करत आहे.

हे ही वाचा - दीपिका पदूकोण सुरुवातीच्या काळात रोज 'या' अभिनेत्याच्या फोटोला किस करुन झोपायची

कोरोनामुळे भीषण परिस्थिती जगभरातच निर्माण झाली असताना सीपीएएकडेही आता कॅन्सरग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी फारसा निधी उरलेला नाही. विवेक त्याच्या परीने या संस्थेला मदत करतो. मात्र आणखी मदतीची गरज आता या संस्थेला आहे. यासाठी विवेकने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 1200 पेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त मुलं आणि त्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घ्या, आपल्या परीने मदत करा, असे आवाहन तो या व्हिडिओमध्ये करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The spread of Covid-19 has put a halt on all our lives. However, some people have it much worse than others. The farmers who are stuck without buyers, migrant workers stranded away from home, the cancer patients and their families who are stuck in the middle of their treatments. I have been working with @CPAAIndia for the past 18 years helping cancer patients in any way that I can. And the need for this help is now more than ever. So here I am standing with this organisation again, helping them raise funds to help kids fighting this deadly disease and we need your help. Cancer not only affects the patients but their entire families and there are thousands of such families who are stranded with little to no food and ofcourse an increased threat of getting Coronavirus. CPAA has been helping more than 1200 such families with daily meals, access to protective gear and help with the treatment. Help us reach more people by heading over to the link in my bio and doing your bit. Every donation count and these kids battling are counting on us to stand up to them.

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi) on

विवेक म्हणतो, 1200पेक्षा जास्त कॅन्सरग्रस्त मुलं आज कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांचे कुटुंबिय देखील आर्थिक अडचणीत आहेत. या परिस्थितीमध्ये देखील या कॅन्सरग्रस्त मुलांवर उपचार होणं तितकंच गरजेचं आहे. हीच ती मदतीची वेळ आहे. फक्त एकट्याने लढून हे युद्ध जिंकू शकत नाही. तुम्हा सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. मी स्वतः गेली 18 वर्षे या संस्थेबरोबर काम करत आहे. माझ्या परीने मी शक्य तेवढी मदत करत आहे. तुम्हीही यामध्ये सहभागी व्हा.' कोरोना संकटामध्ये कॅन्सरग्रस्त मुलांवरही योग्य उपचार झाले पाहिजे म्हणून विवेकने पुढाकार घेतला आहे.

Vivek Oberoi meets cancer patients on birthday- The New Indian Express

विवेक एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबरीने तो सतत सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतो. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या मुलींनाही त्याने मदत केली होती. शिवाय लॉकडाऊनमध्येही तळहातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या जेवणाची सोय देखील विवेक करत आहे. 

vivek oberoi raise fund for children suffering from cancer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vivek oberoi raise fund for children suffering from cancer