सँडलवूड ड्रग्स केस: विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वाला पोलिसांनी पाठवली नोटीस

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 16 October 2020

विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा देखील या प्रकरणात गुंतली असल्याचं समोर आलं आहे. या कारणामुळे प्रियांका अल्वाला बंगळुरु शहर क्राईम ब्रांच पोलिसांनी नोटिस पाठवली आहे.  

मुंबई- सँडलवूड ड्रग केस प्रकरणात नाव आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी पोलिसांना छापेमारी केली होती. त्यानंतर विवेक ऑबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा देखील या प्रकरणात गुंतली असल्याचं समोर आलं आहे. या कारणामुळे प्रियांका अल्वाला बंगळुरु शहर क्राईम ब्रांच पोलिसांनी नोटिस पाठवली आहे.  

हे ही वाचा: धनुष-सारासोबत झळकण्यासाठी अक्षय कुमारच्या मानधनात दुपटीने वाढ

खरं तर सँडलवूड ड्रग केस प्रकरण विवेकची पत्नी प्रियांका अल्वाचा भाऊ आदित्य अल्वाशी संबधित आहेत. ज्यामुळे प्रियांकाला नोटिस पाठवली गेली आहे. सँडलवूड ड्रग केस प्रकरणात आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आदित्यचा हेबल तलाव स्थित फार्महाऊसवर रेव पार्टी आयोजित केली जात होती. ज्यामध्ये सँडलवूड ड्रग केसचे आरोपी सामिल होते. या प्रकरणी गुरुवारी अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या घरी बंगळुरु पोलिसांनी छापेमारी केली होती.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता २ बंगळुरु पोलिस अधिकारी विवेकच्या घरी पोहोचले आणि त्यांनी कारवाई सुरु केली. छापेमारीसंबंधी एका पोलिस अधिका-याने सांगितलं की, 'आदित्य अल्वा फरार आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की अल्वा विवेक ऑबेरॉयच्या घरी लपला आहे.'बंगळुरु पोलिसांनी आदित्यच्या घरी देखील तपास केला आहे.

Vivek Oberoi's brother-in-law Aditya Alva named in Sandalwood drug case -  The Week

आदित्य अल्वा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर कन्नड सिने इंडस्ट्रीतील कलाकारांना ड्रग पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी क्राईम ब्रांच टीमने आधीच कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदी सह काही ड्रग पेडलर्सना अटक केली आहे.   

vivek oberoi wife priyanka alva served notice by bengaluru city in sandalwood drugs case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vivek oberoi wife priyanka alva served notice by bengaluru city in sandalwood drugs case