
Vivian Dsena: बायकोसाठी अभिनेत्याने स्वीकारला इस्लाम! गुपचूप उरकलं लग्न अन् ...
एकेकाळी छोटा पडदा गाजवणाऱ्या प्रसिद्ध कलाकारांमध्ये विवियन डिसेनाचा याचं नाव आवर्जून घ्याव लागतं. त्यानं मधुबाला या मालिकेच्या माध्यामातुन खुप लोकप्रियता मिळवली. त्यांची क्रेझ त्यावेळी खुप होती. ऋषभ कुंद्राच्या भुमिकेतुन तो घराघरात पोहचला. मात्र त्यानंतर तो जास्त चर्चेत आला नाही.
सध्या तो बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून विवियन पुन्हा एकदा चर्चेत आला तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. त्याने गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांना खुप उधाण आले होतेय. त्यातच आता त्यानं धर्मही बदलला आहे. अशी चर्चा सुरु झाली. आता या प्रकरणावर विवियनेच प्रतिक्रिया दिली आहे.
विवियन दसेनाने नुकतिच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की त्याने 2019 मध्येच रमजान महिन्यात इस्लाम धर्म स्वीकारला होता.
याविषयी माहिती देताना तो म्हणाला, “माझ्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. मी ख्रिश्चन जन्माला आलो आणि आता मी इस्लामचे पालन करतो. मी 2019 मध्ये रमजान महिन्यापासून इस्लामचे पालन करण्यास सुरुवात केली.
त्याबरोबर विवियन सांगतो की तो पाच वेळा नमाजही अदा करतो. दिवसातून पाच वेळा प्रार्थना केल्याने त्याला शांती आणि सांत्वन मिळते. त्याचबरोबर त्यांना म्हणाले की मी सर्व अफवांवर पूर्णविराम देत आहे. अलीकडेच विवियनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
विवियन दसेनाने त्याच्या लग्नाबद्दल आणि मुलगी झाल्याबद्दलही सांगितलं. विवियनने सांगितले की, त्याने गेल्या वर्षी इजिप्तमध्ये त्याची गर्लफ्रेंड नौरान अलीशी लग्न केले आणि तो चार महिन्यांच्या मुलीचा पिताही असल्याचंही त्याने सांगितलं. त्याला त्याच्या कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूर ठेवायचे आहे.
विवियन तिच्या लग्नाच्या आणि मुलीच्या चर्चेवर म्हणाला की यात कोणती मोठी गोष्ट आहे आणि कोणाला याची चिंता का आहे? विवियनने सांगितले की, त्याला त्याच्या लग्नाची आणि मुलीच्या जन्माची बातमी त्याला योग्य वेळी द्यायची होती. मात्र याबद्दल इतकी चर्चा सुरु झाली की त्याला याविषयी स्पष्टीकरण द्यावं लागलं.