Gautami Patil: "आता बस्स, थांबायचं!"; गौतमी पाटीलला असं का वाटलं होतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautami Patil

Gautami Patil: "आता बस्स, थांबायचं!"; गौतमी पाटीलला असं का वाटलं होतं?

मुंबई : महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील आपल्या उडत्या चालीवरील गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही कोपऱ्यात तिचा शो असला तरी त्याला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळतो. पण अशा प्रकारची आपली कला सादर करणं एखाद्या महिला कलाकारासाठी नक्कीचं सोपं नसतं.

गौतमीच्या जीवनातही एक असा प्रसंग आला जेव्हा तिला आता बस्स झालं, थांबायचं! असं वाटलं होतं. तिच्या जीवनातला हा सर्वात महत्वाचा प्रसंग तिनं स्वतः कथन केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत तीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Wanted to stop now why did Gautami Patil think like that need to know)

आपल्यामागं कोणचा हात नाही म्हणून...

महिला कलाकार सिनेमांमधून अत्यंत भडक आणि उत्तेजक स्वरुपाचा पेहराव करुन नृत्य सादर करतात. पण त्यांच्यापेक्षा लोकांसमोर थेट स्टेजवरुन कला सादर करणाऱ्या गौतमीला मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली.

यावर बोलताना गौतमी म्हणाली की, कधी तरी मला असं वाटतं की आपल्यावर अफाट टीका झाल्या आहेत. गरीब घरातली मी असल्यानं माझ्यावर सर्वजण टीका करतात का? आपल्याला कोणाचा पाठिंबा नाही किंवा कोणाचा आपल्यामागं हात नाही. त्यामुळंच आपल्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं. (Latest Marathi News)

मी प्रचंड घाबरले होते

पूर्वी माझ्याकडून काही चुका घडल्या पण आता मी व्यवस्थित डान्स करुन अजूनही लोकांचं टीका करणं सुरुच आहे. पण मलाही आता थांबावसं वाटलं होतं. जेव्हा माझा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हाच मला वाटलं होतं आता बस्स थांबायचं!

पण जेव्हा आपलाच आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती परिस्थिती कशी हाताळली हे सांगताना गौतमी म्हणाली, मला जेव्हा या व्हायरल व्हिडिओबाबत कळलं तेव्हा मी घरातचं होते. मला पहिल्यांदा असं कळलं की आम्ही बऱ्याच पोरी होतो मीच एकटीच नव्हते. त्यामुळं आम्ही सर्वचजण घाबरले होतो. माझ्या मैत्रिणींपर्यंत तो व्हिडिओ आला होता.

पण तेही सांगू शकत नव्हते. पण मला कळल्यावर मी एकच विचार केला की आता सगळं संपलंय मला आता काहीही करायचं नाही. नको आता, लोकांना आपली प्रगती बघवत नाही तर ते इथपर्यंत जातात का? असं करतात का? इथपर्यंत आलं होतं. (Marathi Tajya Batmya)

मला अनेकांनी समजावलं

पण मला बऱ्याच जणांनी समजावलं की तू जर थांबलीस तर त्यांच्या म्हणण्यानुसार होणार. त्यामुळं सहाजिकचं आज जर मी थांबले तर त्यांना जे पाहिजे ते घडणार. त्यानंतर माझा बराच काळ कामामध्ये गॅप पडला.

पण मी नंतर नव्यानं सुरुवात केली. त्यावेळी मी खूपच घाबरले होते. कारण मी पुन्हा स्टेजवर गेल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स कसा येईल. पण प्रेक्षकांनी मला खूपच सांभाळून घेतलं. माझ्या चाहत्या वर्गाला मी सॅल्युट करते की त्यांनी मला कणभरही असं जाणवू दिलं नाही की माझ्याबाबतीत असं काही घडलं. त्यामुळं प्रेक्षकांमुळेच मी पुन्हा उभी राहू शकले, जर ते नसते तर मी आज आहे तशीच असते.