टायगरला डच्चू, ज्युनियर एनटीआरला दिली पसंती |War 2 Release Date | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

War 2 Release Date

War 2 Release Date: टायगरला डच्चू, ज्युनियर एनटीआरला दिली पसंती

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि साउथस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर वॉर 2 याचित्रपाटीत आजकाल बरीच चर्चा आहे. आतापर्यंत निर्मात्यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आता खुद्द हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटाबाबत मोठी हिंट दिली आहे.

यापूर्वी, दोन्ही स्टार्सनी त्यांच्या शब्दांत ट्विटरवर वॉर 2 मध्ये एकत्र काम करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर इंडस्ट्रीत पुन्हा चर्चा सुरु झाली होती. .

ज्युनियर एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हृतिक रोशन म्हणाला की, 'रणांगण तुझी वाट पाहत आहे'. यावर प्रतिक्रिया देताना ज्युनियर एनटीआर म्हणाले की, लवकरच सेटवर जॉईन होईल. आता या बातमीनंतर हे दोघेही वॉर2मध्ये एकमेकांसोबत काम करण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं.

आता या चित्रपटाच्या रिलिजबद्दलही माहिती समोर आली आहे. हे ऐकल्यानंतर दोघांचे चाहते खूप खुश दिसत आहेत.

चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल बोलायचं झालं तर, रिपोर्ट्सनुसार, वॉर 2 हा 24 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो. या चित्रपटाचे शूटिंग याच वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. तर वॉर 2 मध्ये, NTR पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. हा एक मोठा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल.

दिग्दर्शक अयान मुखर्जी हा चित्रपट तयार आहे. वॉर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नाही. सध्या तो हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर हा चित्रपट पूर्ण करत आहे. यानंतर तो शाहरुख खान आणि सलमान खानचा पठाण vs टायगर पूर्ण करेल.

तर ज्युनियर एनटीआर त्याच्या NTR30 म्हणजेच 'देवरा' चे शूटिंग पूर्ण करेल. हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांचा आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते खुप उत्सुक आहेत. मात्र या चित्रपटात टाइगर श्रॉफ देखील असेल का असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.