Video : बापरे! भर कार्यक्रमात आलियाने दिली शिवी....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

मुंबई : अभिनेते-अभिनेत्रींनी शिव्या देणं काही नवीन नाही... हल्ली सामान्य तरूणाईच्या तोंडूनही सर्रास शिव्या ऐकायला मिळातात. पण सेलिब्रेटिंच्या तोंडून शिव्या ऐकायला मिळाल्या आणि ते ही जाहीर कार्यक्रमात तर ही गोष्ट प्रचंड व्हायरल होते. असंच काहीसं घडलंय आलिया भटच्या बातीतत...

सत्ते पे सत्ता'च्या रिमेकचं कास्टिंग झालं! कोण साकारणार अमिताभ-हेमामालिनी? 

जिओ मामी फेस्टिव्हलमध्ये 'जिओ मामी मूव्ही मेला विथ स्टार 2019' या कार्यक्रमात आलिया, करिना आणि करण जोहर यांची मुलाखत होती. या मुलाखती दरम्यान करणने आलियाला करिनाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी आलिया करिनाचं कौतुक करताना इतकी फ्लोमध्ये गेली की तिने बोलता बोलता शिवी दिली. अश्लिल शब्द तिच्या तोंडून गेल्याने प्रेक्षकांमध्येही आरडाओरड सुरू झाला. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केलाय. एका इन्स्टाग्राम युझरने हा व्हिडिओ शेअर केलाय.

आलिया माझी वहिनी झाली तर....
जिओ मामी फेस्टिव्हलमध्ये 'जिओ मामी मूव्ही मेला विथ स्टार 2019' या कार्यक्रमात करिनाला रणबीर आणि आलियाच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. 'तुम्ही आलिया रणबीरच्या लग्नाचा तो दिवस तुम्ही इमॅजीन केलाय का, जेव्हा आलिया तुमची वहिनी झाली असेल?' असा सवाल करिनाला करण्यात आला. तेव्हा तिने उत्तर दिले की, 'जर आलिया माझी वहिनी झाली, तर ती जगातली सर्वांत आनंदी मुलगी असेल.' या उत्तराने प्रेक्षक आणि आलिया सर्वच जणांनी हासून प्रतिक्रिया दिली.

काँग्रेस नेत्याच्या मुलीचे हॉट फोटो चर्चेत, तुम्ही पाहिले का?

करिना आलियाची आदर्श
करिना माझी आदर्श आहे, असे आलियाने यापूर्वीच सांगितले होते. या कार्यक्रमादरम्यानही आलियाने करिनाचे खूप कौतुक केले. कुठल्याही अभिनेत्रीचे लग्न झाले की ती कारकिर्द थांबवते, पण करिनाने असे न करता आपले काम सुरूच ठेवले, असे आलियाने सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: watch Alia Bhatt using abusive language in a show