तनुश्री दत्ताच्या प्रकरणावर 'सिंटा'ची असमर्थता !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

'सिंटा'चे सरचिटणीस सुशांत सिंग यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जु्लै 2008 मध्ये 'सिंटा' आणि 'आयएफटीपीसी'च्या संयुक्त तक्रार निवारण समितीने निर्णय दिला होता, जो चूकीचा होता. या निर्णयात असभ्य वर्तवणूकीचा उच्चारही नव्हता. जे दुर्दैवी आहे.

मुंबई : 'तनुश्री विरुद्ध नाना वादात दहा वर्षांपूर्वी 'सिने अॅन्ड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन'ने (सिंटा) दिलेला निर्णय चूकीचाच होता.' असे खुद्द 'सिंटा'नेच कबूल केले आहे! मात्र आता तनुश्री दत्ताला मदत करण्यास सिंटाने असमर्थता दर्शवली आहे. 

'सिंटा'च्या नियमानुसार, 3 वर्ष जुने प्रकरणच 'सिंटा' हाताळू शकते. पण तनुश्रीच्या प्रकरणाला आता 10 वर्ष झाली आहेत. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप 'सिंटा' करु शकत नाही. 

'सिंटा'चे सरचिटणीस सुशांत सिंग यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, '2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या शूटींगवेळी नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याची रितसर तक्रार तनुश्रीने सिंटाकडे केली होती. ही तक्रारही तिने जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हाच केली होती. जु्लै 2008 मध्ये 'सिंटा' आणि 'आयएफटीपीसी'च्या संयुक्त तक्रार निवारण समितीने निर्णय दिला होता, जो चूकीचा होता. या निर्णयात असभ्य वर्तवणूकीचा उच्चारही नव्हता. जे दुर्दैवी आहे. त्यावेळी कार्यकारी समितीवर दुसरे सदस्य होते. या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे 'सिंटा' तनुश्री दत्ताची माफी मागते.' 

'कोणत्याही महिला कलाकारासोबत कोणत्याही प्रकारच्या असभ्य वर्तवणूकीचा 'सिंटा' निषेध करते. 'सिंटा'कडून हे कधीच खपवून घेतले जाणार नाही.' असेही सिंग यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We can not support to Tanushree Dutta says Cine And TV Artist Association