अनेक कलाकारांचा समावेश असलेल्या 'एक थी बेगम'ला प्रेक्षकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

"एक थी बेगम" ही अश्रफ उर्फ सपनाची कहाणी जिने तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. याच सत्य घटनेवरून प्रेरित सचिन दरेकर लिखित, दिग्दर्शित "एक थी बेगम" ही द्विभाषीय एमएक्स ओरिजिनल मालिका ८ एप्रिलपासून एमएक्स प्लेयरवर विनामूल्य प्रदर्शित झाली आहे. 

मुंबई - "एक थी बेगम" ही अश्रफ उर्फ सपनाची कहाणी जिने तिच्या पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. याच सत्य घटनेवरून प्रेरित सचिन दरेकर लिखित, दिग्दर्शित "एक थी बेगम" ही द्विभाषीय एमएक्स ओरिजिनल मालिका ८ एप्रिलपासून एमएक्स प्लेयरवर विनामूल्य प्रदर्शित झाली आहे. 

१९८० मध्ये जेव्हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अंडरवर्ल्डचा काळावर विस्मयकारक पगडा होता त्या काळातील बेगम ची ही १४ भागांची कथा आहे. "एक थी बेगम" मधील बेगम हे मुख्य पात्र म्हणजेच अश्रफ भाटकर सुंदर, देखणी स्त्री. नवऱ्याच्या खुनाचा सूड घेण्यासाठी अश्रफ मध्ये झालेला अद्भुत बदल या पात्राला अनुजा साठे या अभिनेत्री ने वेबसिरीज मध्ये उत्तम न्याय दिला आहे. प्रेक्षकांनी या बेगमला प्रचंड दाद दिली आणि अनुजा साठेचे ही वेगवेगळ्या माध्यमातून कौतुक करण्यात आले.

Image may contain: 1 person, close-up

मुख्य पात्राला रंगत तेव्हाच येते जेव्हा सहकलाकार ही तेवढ्याच ताकदीचे आणि जाणते असतात. "एक थी बेगम" मध्ये मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक अनुभवी कलाकार पाहायला मिळाले. अंकित मोहन यांनी साकारलेलं जाहीर भाटकर म्हणजेच अश्रफ चा पती हे पात्र फार कमी भागांमध्ये असेल तरी त्या पात्रामुळे कथेला तसेच मुख्य पात्राला जीव आला हे खरं त्याचबरोबर मकसूद हे खूप कमी शब्दात व्यक्त होणार कठोर असं खलनायकाच पात्र अजय गेही या अभिनेत्याने अतिशय सुंदर रित्या निभावले आहे.

राजेंद्र शिसातकर यांनी साकारलेल्या नाना म्हात्रे या भूमिकेला ही लोकांनी भरभरून दाद दिली त्यांचे खूप कौतुक ही करण्यात आले. मराठी चित्रपट सृष्टीत गेली अनेक वर्षे गाजलेले अभिनेते चिन्मय मांडलेकर हे विक्रम भोसले तर अभिजीत चव्हाण हे इन्स्पेक्टर तावडे ह्या भूमिकेत बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे विजय निकम यांनी भाई चव्हाण तर अनिल नगरकर यांनी भाऊ नारे या डॉनच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांमध्ये अनेक वेळा नायक ह्या भूमिकेत दिसणाऱ्या संतोष जुवेकर यांनी सवत्या या खलनायकाची भूमिका निभावली आहे तर राजू आठवले यांनी बाळा मामा हे पात्र साकारलेलं या वेबसिरीज मध्ये पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे अंजली दिक्षित यांनी रेशम ही भूमिका साकारली असून प्रदीप डोईफोडे हे इन्स्पेक्टर भोईर हे पात्र निभावताना दिसत आहे. अमित राज हे प्राख्यात संगीत दिग्दर्शक हे एका छोट्या पण खूप छान भूमिकेत "एक थी बेगम"च्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. अशी अनेक कलाकारांनी परिपूर्ण "एक थी बेगम" ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनास आणि प्रशंसेस पात्र ठरली आहे.

web series ek thi begum gets overwhelming response from viewers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: web series ek thi begum gets overwhelming response from viewers