...म्हणून सध्या सीरिअल चित्रपटांपेक्षा वेबसिरीजची चलती...

...म्हणून सध्या सीरिअल चित्रपटांपेक्षा वेबसिरीजची चलती...

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनाच्या दुनियेत पाहिल्यास वेब सिरीजचीच जास्त चलती आहे. नवनवीन वेबसिरीजनी चित्रपट आणि सीरिअलनाही आता मागे टाकायला सुरवात केली आहे. तसे पहायला गेल्यास त्याची कारणेही तशीच आहेत. वेबसिरीजनी घातलेला नवनवीन विषयांना हात हे खरेतर महत्वाचे कारण आहे. टीव्ही सीरिअल मधल्यासारखी सासू सुनांची भांडणे इथे नाहीत किंवा तेच रडगाणे नाही. इथे प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी दर्जेदार पहायला मिळत असते.

वेब सिरीजचे 8 ते 10 भाग असतात. या सिरीज वेगवेगळ्या घटनांवर आधारित असते. एक भाग साधरणतः 25 ते 45 मिनीटापर्यंतचा असतो. याच तुलनेत टीव्ही सीरिअलचे पहायला गेल्यास एकाच विषयावर सातत्याने भाष्य केलेले असते किंवा तीच सासू सुनांची भांडणे दाखवलेली असतात. यामुळे प्रेक्षक एका ठराविक वेळेनंतर कंटाळून जातो. त्याचबरोर प्रेक्षकांना कुठल्याही प्रकारचा बोल्ड विषय पाहता येत नाही कारण सेन्सॉर बोर्डाची सिरियलवर नजर असते. वेब सिरीजवर तसे पहायला गेल्यावर सेन्सॉर बोर्डाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण असत नाही. चित्रपटातही एखादे बोल्ड दृश्य असल्यास सेन्सॉर बोर्डासोबत वाद होत असतो आणि यामध्ये बरेच दिवस चित्रपट अडकून पडतात.

तसेच, टेलीकॉम कंपन्यांनी इंटरनेट सुविधा जवळपास मोफत केली असल्याने ऑनलाईन वेबसिरीज पाहणे प्रेक्षकांसाठी अगदी सोपे झाले आहे. तसेच वेबसिरीज मोबाईलवरही पाहता येऊ शकते या कारणाने युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर वेबसिरीजकडे आकर्षित होत आहे. त्याचबरोर वेबसिरीजची लोकप्रियता पाहून बॉलीवुडचे मोठमोठे सितारेही वेबसिरीजमध्ये काम करताना आपल्याला पहायला मिळत आहेत. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, विवेक ओबेराय, अली फजल आणि पंकज त्रिपाठी सारखे नावाजलेले हिंदी सिनेमामधील अभिनेते वेबसिरीजमध्ये काम करताना दिसत आहेत. या सर्वच कारणांमुळे सध्या सिरिअल आणि चित्रपटांपेक्षा वेसिरीजची जास्त चलती आहे असे म्हणायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com